घरदेश-विदेशआज भारत-चीन सैन्यात मेजर जनरल पातळीवर चर्चा

आज भारत-चीन सैन्यात मेजर जनरल पातळीवर चर्चा

Subscribe

भारत-चीन सीमावाद मिटवण्यासाठी आज भारत आणि चीन लष्कराची मेजर जनरल पातळीवर पुन्हा चर्चा होणार आहे.

पूर्व लडाखमधील एलएसीवर तीन ठिकाणांवरून चीनी सैन्य मागे गेल्यानंतर हा वाद पूर्णपणे संपवण्यासाठी भारत आणि चीन लष्कराची मेजर जनरल पातळीवर बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे. भारत-चीनमधील तणाव किती प्रमाणात कमी होईल हे या बैठकीत निश्चित होईल. अशा परिस्थितीत या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत-चीन सीमावादावरुन सध्या दोन्ही देशात वातावरण तापलं आहे. याआधी भारत आणि चीन यांच्यात ६ जून रोजी चुशूल येथे लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चा झाली होती.

तथापि, सीमेवरील दोन्ही देशांच्या अलीकडील हालचालीवरून भारत-चीनमधील तणाव काहीसा कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. विशेष करुन चिनी सैन्याने माघार घेतल्याने हे सूचित केलं आहे. तथापि, तज्ञांचे मत आहे की फिंगर-४ वाद लवकरच सोडविला जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, आज मेजर जनरल पातळीवर चर्चा होणार आहे.

- Advertisement -

या भागात वाद

डेड एंडच्या चार ठिकाणांपैकी, पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग एरिया मधील सैनिक थोडेसे मागे हटले आहेत. ३ जून रोजी चीनी सैन्याने गॅलवान खोऱ्यातून सुमारे २ किमी अंतरावर माघार घेतली होती. पांगोग त्सो परिसरातील फिंगर-४, गॅलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट-१४, पेट्रोलिंग पॉईंट-१५ आणि हॉट स्प्रिंग एरिया हे चार डेड एंडचे पॉईंट्स आहेत. स्थानिक कमांडर स्तरावर डेड एंडच्या वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रतिनिधीमंडळ आणि सर्वोच्च कमांडर यांच्यात चर्चा झाली तर तोडगा निघू शकेल.


हेही वाचा – कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने चीनच्या वुहान शहराला मागे टाकलं

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -