घरदेश-विदेशभारत-चीन तणाव : ५०० कोटींची शस्त्रे खरेदी करण्यास सरकारची परवानगी

भारत-चीन तणाव : ५०० कोटींची शस्त्रे खरेदी करण्यास सरकारची परवानगी

Subscribe

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

पूर्व लडाखमधील चिनी सैन्याशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन सैन्यांना प्राणघातक शस्त्रे आणि दारूगोळा खरेदीसाठी ५०० कोटींच्या आपत्कालीन निधीस मान्यता दिली आहे. सरकारने तिन्ही सैन्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ५०० कोटी पर्यंत प्राणघातक शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, सरकारने शस्त्रे तातडीने खरेदी करण्यासाठी तीन सैन्य दलांच्या प्रमुखांना ५०० कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक पाठबळ दिलं आहे.

अहवालानुसार, पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हल्ल्यानंतर आणि वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्यावर आपत्कालीन परिस्थितीत सैन्याला शस्त्रे खरेदी करण्याची ताकद सरकारकडून देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने दलाला हा अधिकार देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी उरी हल्ला आणि पाकिस्तान विरुद्ध बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलांना आर्थिक अधिकार देण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी


बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने सरकारकडून देण्यात आलेल्या अशा सूटचा सर्वाधिक फायदा घेतला होता. त्यानंतर हवाई दलाने मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रे खरेदी केली आहेत. या शस्त्रामध्ये एअर-टू-ग्राउंड आणि एअर-टू-एयर स्टँड-ऑफ स्पाइस-२००० आणि स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर सैन्याने इस्त्रायली स्पाइक अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र हस्तगत केले आहेत. लष्कराने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील खरेदी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -