Video : मृतदेहाने केलं शेवटचं बाय..घाबरत असाल तर व्हिडिओ अजिबात बघू नका!

या मृतदेहाला जेव्हा कबरीत ठेवण्यात आलं. तेव्हा तो हात हालवू लागला.

तुमच्या समोर असणारा मृतदेह अचानक हलचाल करू लागला तर… तुमची काय अवस्था होईल? अशीच काहीशी अवस्था इंडोनेशियातील दफनभूमीत उपस्थित असणाऱ्या लोकांची झाली आहे. या दफनभुमीत दफनविधी सुरू असताना मृतदेहानं हात हलवून सर्वांना शेवटचा गूड बाय केलं. आणि मृतदेहाची ही हालचाल व्हिडिओमध्ये कॅप्चर झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या मृतदेहाला जेव्हा कबरीत ठेवण्यात आलं. तेव्हा तो हात हालवू लागला. त्यावेळी कुणाचं लक्ष नव्हतं मात्र अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. द सनने या विषयी रिपोर्ट दिला आहे. हा व्हिडिओ नीट बघितल्यावर दिसतं. धर्मगुरू जेव्हा शेवटची प्रार्थना म्हणत असतात तेव्हाच या मृतदेहाचा हात हलतो.

ईश्वरने जॉनच्या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, मी जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जिवंत राहतो, मृत्यूनंतरही.  धर्मगुरूंच्या या वाक्यानंतरच मृत व्यक्तीचा हात हलू लागतो. लोकं हा व्हिडिओ पाहून प्रचंड घाबरले. अनेकांना तर वाटलं की आपण जिवंत व्यक्तीला दफन केलं.

काय आहे तज्ञांच म्हणणं,

तज्ज्ञांनी सांगितलं की,  मृतदेह आखडल्याने असं होऊ शकतं. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर ७२ तासांत मृतदेह आखडू लागतो. मांसपेशी खेचल्या जातात आणि त्यामुळेच हात वर झाला असावा आणि सर्वांना वाटलं की तो हात हलवत आहे.


हे ही वाचा – ‘बायबल’ विषयावरील ऑनलाईन क्लासमध्ये सुरू झाला पॉर्न व्हिडिओ आणि….!