Indonesia Earthquake : इंडोनेशियामध्ये सोमवारी (28 ऑगस्ट) मध्यरात्री भूकंपाचे (Indonesia Earthquake) मोठे हादरे बसले आहेत. इंडोनेशियातील बालीमध्ये पहाटे 2 च्या सुमारास भूकंपामुळे रस्त्यांना तसेच इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली आहे. रॉयटर्सने युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजी सेंटर (EMSC) च्या हवाल्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. भूकंप झाला तेव्हा लोक गाढ झोपेत होते, मात्र अचानक हादरे बसायला लागल्यावर लोक आपापल्या घरातून बाहेर आले. (Indonesia Earthquake 6.8 magnitude earthquake in Indonesia No tsunami threat)
हेही वाचा – …आणि ‘तो’ चंद्रावर चालत असताना त्याच्या मागून चक्क ऑटो आली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
रॉयटर्सने युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजी सेंटरने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू मातारम, इंडोनेशियाच्या उत्तरेस 201 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किलोमीटर (322 मैल) खाली होता. या भूकंपात किती नुकसान झालं याची अद्यापपर्यंत माहिती मिळू शकली नाही. परंतु या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Hey, everyone. Woke up at 4am here in Bali with hotel swaying. Earthquake. Just posting to say my daughter & I are safe. Prayers for anyone affected by this event. #earthquake #Indonesia #Bali pic.twitter.com/5gAIyFma1I
— Gregory Bledsoe MD MPH MBA (@ghbledsoe) August 28, 2023
भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने बालीमध्ये झालेल्या भूकंपची तीव्रता 7.1 एवढी मोजली आहे. इंडोनेशियातील पश्चिम नुसा टेंगारा येथील बांगसाल जवळील भूकंपाच्या केंद्राच्या खाली 525 किमी खोलवर हा भूकंप झाला. समुद्रात खोलवर आलेल्या या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असे यूएस त्सुनामी चेतावणी प्रणालीने म्हटले आहे. भूकंपाची ताकद भूपृष्ठाच्या खाली असलेल्या त्याच्या सापेक्ष मोठ्या खोलीमुळे कमी झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा – मध्यप्रदेशमधील दलित अत्याचारांच्या घटनांमुळे भाजपचं वाढलं टेन्शन; दलित व्होटबँक कमी होण्याची शक्यता?
इंडोनेशियात मागील काही महिन्यात भूकंपाचे हादरे
दरम्यान, यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार 2 एप्रिल 2023 मध्यरात्री इंडोनेशियातील पापुआ न्यू गिनीला 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. स्थानिक वेळेनुसार हा भूकंप पहाटे 4 वाजता आला होता. तटीय शहर वेवाकपासून 97 किलोमीटर अंतरावर आणि 62 किलोमीटर खोलीवर आला होता. याशिवाय इंडोनेशियाच्या सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर पूर्वेला न्यू गिनी बेटावरील परिसर फेब्रुवारीच्या शेवटी भूकंपाने हादरला होता. न्यू ब्रिटन प्रदेश पूर्व पापुआ न्यू गिनीमधील द्वीपसमूहाचा भाग असून याठिकाणीही 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता.