घरदेश-विदेशइंडोनेशिया विमान अपघात; लँडिंग गियरचा तुकडा सापडला

इंडोनेशिया विमान अपघात; लँडिंग गियरचा तुकडा सापडला

Subscribe

इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त लायन एयरच्या विमनाचा लँडिंग गियरचा तुकडा समुद्रातुन बाहेर काढल्याचे सांगितले आहे. याआधी अपघातग्रस्त विमानाचे एक ब्लॅक बॉक्स मिळाला होता.

इंडोनेशियामध्ये १८९ प्रवाशांनी भरलेले विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १३ व्या मिनिटात समुद्रात कोसळले होते. इंडोनेशिया सरकारकडून समुद्रामध्ये या विमानाचा शोध सुरु आहे. आतापर्यंत विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. तर गुरुवारी इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त लायन एयरच्या विमनाचा लँडिंग गियरचा तुकडा समुद्रातुन बाहेर काढल्याचे सांगितले आहे. याआधी अपघातग्रस्त विमानाचे एक ब्लॅक बॉक्स मिळाला होता. याच ब्लॅक बॉक्समुळे नेमकी दुर्घटना कशी घडली याचा शोध लावता येणार आहे.

लँडिंग गियरचा तुकडा सापडला

अपघातग्रस्त विमानाचा शोध घेणाऱ्या एजन्सीच्या प्रमुख मुहम्मद स्योगी यांनी लँडिंग गियरबद्दल सांगितले की, आम्हाला लँडिग गियरचा काही भाग सापडला आहे. लायन एयरचे बोइंग – ७३७ मॅक्स ८ विमानाने सोमवारी राजधानी जकार्ता येथून उड्डान घेतले होते. अवघ्या १३ मिनिटामध्ये जावाजवळ विमान क्रॅश होऊन समुद्रात पडले. या विमानामधून प्रवास करणारे १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमानाला काही महिन्यापूर्वीच सेवेमध्ये आणले होते.

- Advertisement -

विमानाचा आणि मृतदेहांचा शोध सुरु

विमान अपघातानंतर समुद्रामध्ये विमान आणि त्यामधील प्रवाशांची शोधमोहीम सुरु करण्यात आली. एयर लाइंसचे प्रवक्ता युसुफ लतीफ यांनी सांगितले की, आतापर्यंत हे माहिती पडले नाही की, किती लोकांचा मृत्यू झाला आहे. याविमानातून एकूण १८९ प्रवासी होते. या अपघातग्रस्त विमानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रामध्ये स्मार्टफोनचे कव्हर, प्रवाशांच्या बॅग, बूट, विमानाचे काही तुकडे समुद्रात तरंगताना पहायला मिळत आहेत. हे सर्व सामान तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

अशी घडली होती घटना

जकार्ता येथून लायन एअरच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या प्रवासी विमानाने सकाळी ६.२० वाजता उड्डाण केले. रन वे मोकळा नसल्यामुळे विमान ११ मिनिटं उशीराने टेक ऑफ करण्यात आले. उड्डाणानंतर केवळ १३ मिनिटातच या विमानाचा एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला. त्यानंतर जवळपास दोन नॉटिकल (३.७ किलोमीटर) कारावांग समुद्रामध्ये विमान क्रॅश झाले. अपघातग्रस्त विमानामध्ये १८१ प्रवासी ज्यामध्ये एका लहान मुलाचा आणि दोन बाळांचा समावेश होता. तसंच ८ क्रू मेंबर्स असे एकूण १९० प्रवासी विमानात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -