घरताज्या घडामोडी#CAAProtest: थंडीत चिमुकल्याचा मृत्यू मात्र आई अजूनही आंदोलनावर ठाम

#CAAProtest: थंडीत चिमुकल्याचा मृत्यू मात्र आई अजूनही आंदोलनावर ठाम

Subscribe

गेल्या दीड महिन्यापासून नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात दक्षिण दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आंदोलनात सोमवारी चार महिन्यांच्या चिमुकल्याचा थंडीमुळे मृत्यू झाला. या चार महिन्यांच्या चिमुकल्याचे नावं मोहम्मद असून त्यांची आई त्याला दररोज आंदोलनात आणत होती. आंदोलन त्याला आई मांडीवर झोपवायची, खायला घालात असतं तसंच त्याच्या गालावर तिरंगा रंगवत असतं. मात्र आता मोहम्मद पुन्हा शाहीन बागेत दिसणार नाही. शाहीन बागेत आंदोलनात असताना मोहम्मदला थंडीमुळे सर्दी आणि छातीत कफ झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तरी देखील मोहम्मदची आई अजूनही शाहीन बाग आंदोलनात सहभाग घेत आहे.

मोहम्मदची आई म्हणते की, ‘हे माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आहे.’ मोहम्मदचे आई-वडील बाटला हाऊसच्या परिसरात प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांनी तयार केलेल्या छोट्याशा झोपडपट्टीत राहत आहेत. त्यांनी अजून दोन मुलं आहे. पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. मोहम्मदचे वडील भरतकाम करत करून ई-रिक्षा चालवतात. तर त्यांची आई वडिलांना भरतकामात मदत करते.

- Advertisement -

मोहम्मदचे वडील म्हणाले, ‘भरतकाम तसंच ई-रिक्षा चालवून देखील मी गेल्या महिन्यात जास्त कमाई केली नाही. आता माझ्या बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्वकाही गमावले आहे.’

‘आय लव्ह माय इंडिया’ असं लिहिलेली टोपी घातलेल्या मोहम्मदचा फोटो त्यांनी दाखवला. मोहम्मदची आई नाझियाने सांगितलं की, ३० जानेवारीच्या रात्री आंदोलनावरून घरी परत आल्यानंतर झोपतेच मोहम्मदचा मृत्यू झाला. ती म्हणाली, रात्री एकच्या सुमारास शाहीन बागेतून घरी आलो. मुलं झोपल्यानंतर मी देखील झोप गेली. सकाळी उठून पाहिलं तर मोहम्मद काहीही हालचाल करत नव्हता. मग त्याला आम्ही नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मत घोषित केलं.

- Advertisement -

मोहम्मदची आई नाझिया १८ डिसेंबरपासून दररोज शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारित कायद्या विरोधात आंदोलनास जात असतं. नाझिया म्हणाली की, त्याला फक्त सर्दी झाली होती आणि ती त्याच्या जीवावर बेतली. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण मृत्यूच्या दाखल्यात स्पष्ट केलेलं नाही. सीएए आणि एनआरसी सर्वांच्या विरोधातील आहे आणि शाहीन बागच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे. मात्र यावेळी ती मुलांना या आंदोलनात सहभागी करणार नाही आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘शाहीनबाग आंदोलन हे नियोजित कटकारस्थान’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -