Inflation : साबण, डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ, ग्राहकांना मोजावे लागणार…

Inflation hul and itc hike price of soaps detergents citing input cost pressures
Inflation : साबण, डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ, ग्राहकांना मोजावे लागणार...

देशात कोरोना महामारीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलेंडर, इंधन, डाळी, खाद्यतेल आदींचा समावेश आहे. अशातच आता साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांच्या साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे.

व्हील डिटर्जेंट पावडर आणि रिन बारची किंमत वाढली

१ किलोची व्हील डिटर्जेंट पावडरच्या किमतीमध्ये ३.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना व्हील पावडरसाठी २ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. तर या पावडरचा ५०० ग्रॅमचा पॅक २ रुपयांनी महागला असून ग्राहकांना तो आत्ता २८ रुपयांऐवजी ३० रुपये किमतीने खरेदी करावा लागणार आहे.

तर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा २५० ग्रॅमचा रिन बार साबण ५.८ टक्क्यांनी महागला आहे. याशिवाय लक्स साबणाची किंमत २१.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यामुळे लक्सचा १०० ग्रॅमचा मल्टीपॅक आत्ता २५ रुपयांनी महाग झाला आहे.

त्याचवेळी आयटीसीने फियामा साबणाच्या किंमतीत १० टक्के, विवेलमध्ये ९ टक्के आणि १५० एमएलच्या ऐंगेज डियोड्रंटमध्ये ७.६ टक्के तर १२० एमएलच्या बॉटलमध्ये ७.१ टक्क्यांची वाढ केली आहे. साबण आणि डिटर्जंटच्या वाढत्या किमती आत्ता येत्या काळात सर्व सामान्य नागरिकांचा खिसा साफ करणार आहेत.

किंमत नेमक्या का वाढल्या?

या दोन प्रमुख कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याने वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे. मात्र काही निवडक वस्तूंच्या किंमतींमध्येच कंपनीने वाढ केली आहे.


कोरोनानंतर सौदी अरेबियात भारत, पाकिस्तानसह ‘या’ सहा देशांतील प्रवाशांना मिळणार प्रवेश