Inflation: नव्या वर्षात सर्वसामान्यांना मोठा दिलासा! जानेवारी महिन्यात महागाईमध्ये १२.९६ टक्क्यांची घसरण

नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात इंधनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली असून सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबरच्या तुलनेत घाऊक महागाई जानेवारीमध्ये कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात १२.९६ टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबर घाऊक महागाईचा आकडा १३.५६ टक्के इतका होता. मात्र, यंदाच्या टक्क्यातील फरक लक्षात घेता घाऊक महागाईत घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

महागाईचा दर वाढल्यामुळे वस्तूंचा पुरवठा खर्चिक झाल्याने सामान्य जनजीवन प्रभावित होते. गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा उच्चांक वाढला होता. घाऊक महागाईचा दर १२ वर्षांचा विक्रम मोडत १४.८७ टक्क्यांवर पोहचला होता.वर्षभरापूर्वीच्या तुलनेत घाऊक महागाईने उच्चाकं गाठला आहे.

जानेवारी महिन्यातील २०२१ मध्ये घाऊक महागाई दर २.५१ टक्के इतका कमी होता. तर वार्षिक आधारावर घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे. भाज्यांचा किंमतीचा दर मागील महिन्यात ३१.५६ टक्क्यांच्या तुलनेत ३८.४५ टक्के आहे. WPI म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक. हा एक निर्देशांक आहे ज्यावर घाऊक वस्तूंच्या किंमती जाहीर केल्या जातात. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये WPI महागाई दरात वाढ झाली असली तरी जानेवारीत काहीसा दिलासा मिळाला आहे.

महागाईबाबत सरकारचं मोठं वक्तव्य

जानेवारी २०२२ मध्ये महागाई वाढण्यामागील कारण म्हणजे खाद्यतेल, खनिज तेल, कच्चे तेल आणि वायूसोबतच पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादनांसोबतच खाद्यपदार्थांच्या किंमतीतही वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक महागाईत मोठी वाढ दिसून आली आहे.

मागील वर्षातील डिसेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ५.५९ टक्के इतका होता. गेल्या पाच महिन्यांमध्ये महागाईचा दर सर्वात उच्च आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ४.९१ टक्के, ऑक्टोबरमध्ये ४.४८ टक्के इतका होता.


हेही वाचा : ABG Shipyard Case: सर्वात मोठ्या बँक फ्रॉड प्रकरणी एनडीए सरकारकडून मोठी कारवाई, केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती