घरदेश-विदेशInfluence: महागाईची झळ! साबण आणि डिटर्जंटचे दर 20 टक्क्यांनी महागले

Influence: महागाईची झळ! साबण आणि डिटर्जंटचे दर 20 टक्क्यांनी महागले

Subscribe

यामुळे HUL चे व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाइफबॉय या रेंजचे प्रोडक्ट्स खरेदी करताना ग्राहकांना आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल, डिझेल, खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीमध्ये आता घरगुती वापराच्या इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची तीव्र झळ सहन करावी लागणार आहे. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी विभागातील कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलीवरनं (Hindustan Unilever) साबण आणि डिटर्जंटच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे HUL चे व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाइफबॉय या रेंजचे प्रोडक्ट्स खरेदी करताना ग्राहकांना आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत.

कच्चा मालाच्या किमती वाढल्याने प्रोडक्सच्या किमतींमध्ये वाढ केल्याचे एचयूएल कंपनीने म्हटले आहे. तर इनपूट कॉस्टमधील वाढील्याने कंपनीला गेल्या वर्षी देखील बहुतांश उत्पादनांच्या किमतीत वाढ करावी लागली होती.

- Advertisement -

या कंपनीने आता सर्फ एक्सेल बारची किंमत मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. यापूर्वी 2 रुपयांनी वाढवलेली किंमत आत्ता 20 टक्क्यांनी वाढवण्यात आलीय. यामुळे सर्फ एक्सल बारसाठी आता 10 रुपयांऐवजी 12 रुपये मोजावे लागणार आहे. तर 125 ग्रॅमचा पीअर्स साबण 7 रुपयांनी महागला आहे. यामुळे 76 रुपयांना मिळणारा पीअर्स साबण आता 83 रुपयांना मिळणार आहे.

याशिवाय 125 ग्रॅमचा लाइफबॉय पॅक 29  रुपयांवरुन 31 रुपये इतका झाला आहे. तर रिन साबणाचा बंडल पॅक 72  रुपयांवरुन 76 पये इतका झाला आहे. याचबरोबर 250  ग्रॅम सिंगल बारची किंमत 18  रुपयांवरुन 19 रुपये इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या काही प्रोडक्टसच्या किमती 1 ते 33 टक्क्यांपर्यंत वाढवल्यात.

- Advertisement -

याशिवाय 2022 मध्ये अडानी विल्मरने (Adani Wilmar) पॅकिंग गव्हाच्या पीठाची किंमत 5-8 टक्के आणि बासमीत तांदळाचा किंमत 8-10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यामागेही खर्चात वाढ हे कारण सांगितले जात आहे.
पार्ले प्रोडक्ट्सने देखील आपल्या उत्पादनाच्या किमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.


Covaxin Booster Dose : कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसने डेल्टा, ओमिक्रॉन होतोय निष्क्रिय, भारत बायोटेकचा दावा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -