Infosys : कोरोना काळतही इंफोसिस करणार ५५ हजार तरूणांची भरती

infosys

आयटी कंपन्या कोरोनासारख्या अतिशय कठीण परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम करत आहेत. देशातील प्रमुख सॉफ्टव्हेअर कंपन्यांपैकी एक सॉफ्टव्हेअर कंपनी असलेल्या Infosys ने चालू आर्थिक वर्षात ५५ हजारांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे देशातील मोठ्या प्रमाणातील तरूण वर्गाला कोरोनाच्या संकटाच्या काळात एक चांगली संधी चालून आली आहे.

इंफोसिसचे चीफ फायनान्शिअल अधिकारी (CFO) नीलांजय रॉय यांनी स्पष्ट केल्यानुसार कंपनीचे लक्ष्य हे देशातील टॅलेंट पूल वाढवणे हे आहे. त्यासोबतच कंपनीला अधिक उत्तमोत्तम कामगिरीसाठी गुंतवणूक करण्याचेही उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल हायरिंग कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची भरती करण्याचे उदिष्ट कंपनीने ठेवले आहे. आर्थिक वर्ष
२०२०-२१ मध्ये इन्फोसिसचे नेट प्रॉफिट ५ हजार १९७ कोटी रूपयांवरून ५ हजार ८०९ कोटी रूपयांवर गेले आहे.

कर्मचाऱ्यांची वाढते आहे संख्या

इन्फोसिसने जाहीर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीच्या एकुण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ इतकी होती. ही कर्मचारी संख्या २०२१ मध्ये वाढताना २ लाख ९२ हजार ६७ इतकी झाली आहे. कंपनीमध्ये एकुण कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के आहे. टीसीएसच्या एकुण कामगारांची संख्या ५ लाख ५६ हजार ९८६ इतकी झाली आहे. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख आहे. तसेच विप्रोच्या एकुण कामगारांची संख्या २ लाख ३१ हजार ६७१ इतकी आहे. विप्रोमध्ये ४१ हजारांहून अधिक कर्मचारी गेल्या तिमाहीत भरती करण्यात आले. टीसीएसने आपल्या शेअर होल्डर्सला सात रूपये प्रति शेअर आणि विप्रोला एक रूपये प्रति शेअरचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे.