घरदेश-विदेशइन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, जाणून घ्या आता कोणत्या कंपनीत जाणार?

इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, जाणून घ्या आता कोणत्या कंपनीत जाणार?

Subscribe

मोहित जोशी गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसमध्ये काम करत होते. मोहित जोशी जूनपर्यंत कंपनीत काम करतील.

Infosys President Mohit Joshi resigns: इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसमध्ये काम करत होते. मोहित जोशी जूनपर्यंत कंपनीत काम करतील. नुकतेच इन्फोसिसचे माजी अध्यक्ष रवी कुमार यांनीही राजीनामा दिला होता. ते आयटी कंपनी कॉग्निझंटचे सीईओ बनले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, मोहित जोशी यांनी 11 मार्च 2023 रोजी राजीनामा दिला आहे. या कंपनीत त्यांचा शेवटचा दिवस 9 जून 2023 रोजी असणार आहे. मोहित जोशी यांनी कंपनीसाठी केलेल्या सेवा आणि योगदानाचे संचालक मंडळ कौतुक करत आहे. इन्फोसिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मोहित कंपनीच्या सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, लाईफ सायन्स बिझनेससाठी काम पाहत होते.

- Advertisement -

मोहित आता टेक महिंद्रामध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. टेक महिंद्राने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, मोहित जोशी यांना २० डिसेंबर २०२३ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक केले जाईल. मोहित जोशी १९ डिसेंबर २०२३ पासून कंपनीचे एमडी म्हणून पदभार स्वीकारतील. कंपनी कायदा २०१३ नुसार, मोहित जोशी यांची व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती २० डिसेंबर २०२३ ते १९ डिसेंबर २०२३ पर्यंत म्हणजेच पाच वर्षांसाठी असेल. मोहित यांनी इन्फोसिसच्या आधी ABN Ambro, ANZ Grindlays कंपनीत काम केले आहे.

मोहित जोशी २००० मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले. याआधी ते युरोपमधील आर्थिक व्यवसायाचे नेतृत्व करत होते. २००७ मध्ये, मोहित यांची इन्फोसिस मेक्सिकोचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. मोहित यांनी लॅटिन अमेरिकेत इन्फोसिसची पहिली उपकंपनी स्थापन केली. मोहित २०१४ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोसच्या यंग ग्लोबल लीडर्स प्रोग्रामशी देखील संबंधित होता. याशिवाय ते युवा अध्यक्ष संघटनेचे सदस्यही आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -