घरदेश-विदेश'या' कंपनीत पगार होणार दुप्पट!

‘या’ कंपनीत पगार होणार दुप्पट!

Subscribe

इन्फोसिस कंपनीने ६ पेक्षा जास्त ब्रिज प्रोग्रॅम विकसित केले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीत ३ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, अशांसाठी हा प्रोग्राम फायदेशीर आहे.

इन्फोसिस ही तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट करत आहे. मात्र, सरकट सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार नसून, ज्यांनी कंपनीचा  ‘ब्रिज प्रोग्राम’ पूर्ण केला आहे त्याच कर्मचाऱ्यांची पगारवाढ कंपनी करणार आहे.  ‘ब्रिज प्रोग्राम’ सारखे प्रोग्राम्स कर्मचाऱ्यांना सध्याच्या कामाच्या तुलनेत अधिक कौशल्यपूर्ण काम मिळवण्यासाठी लाभदायक ठरतात. आपल्या कर्मचाऱ्यांना कंसल्टिंग, ऑटोमेशन, आर्टिफिशल इंटेलिजंस आणि मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळावं यासाठी टीसीएस – विप्रोसारख्या अनेक भारतीय आयटी कंपन्या पुढाकार घेत आहेत. याच धर्तीवर इन्फोसिस कंपनीने ६ पेक्षा जास्त ब्रिज प्रोग्रॅम विकसित केले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीत ३ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी इन्फोसिनने एक खास प्रोग्राम सुरु केला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी कन्सल्टिंग प्रोग्राम

साधारणत: एकाच कंपनीत ३ वर्षांचा काळ पूर्ण केल्यानंतर कर्मचारी प्रमोशन किंवा पगारवाढीच्या दृष्टीने दुसरी नोकरी पाहायला सुरुवात करतो. अन्यथा एखादा कर्मचारी उच्च शिक्षणासाठी नोकरी सोडतो. अशा कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी टिकवून ठेवावी यासाठी इन्फोसिसने खास कन्सल्टिंग प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात एका टेस्टचा आणि तीन महिन्यांचा पुस्तकी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात त्या कर्मचाऱ्यांना एका कन्सल्टिंग प्रोजेक्टवर ६ महिन्यांसाठी इंटर्नशीप करावी लागते. जे कर्मचारी हा प्रोग्राम पूर्ण करतील त्यांना अधिक सॅलरीचं पॅकेज आणि पदोन्नती करण्याची संधी देण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी हा प्रोग्राम यशस्विरित्या पूर्ण केला असून, प्रोग्राम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ८० ते १२० टक्के पगारवाढ झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आहे त्याच कंपनीत काम पुढे सुरु ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम लाभदायक ठरेल असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -