घरदेश-विदेशअंधभक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही, त्यासाठी...; ठाकरे गटाचा मोदी-शहांवर निशाणा

अंधभक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही, त्यासाठी…; ठाकरे गटाचा मोदी-शहांवर निशाणा

Subscribe

मुंबई : घराणेशाही, परिवारवाद यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडे बोलू लागले आहेत व त्यांचे बोलणे गमतीचे आहे. पण नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंधभक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार? असे तीखट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – भाजपाच्या दृष्टीने गरिबांच्या जीवाची किंमत नाही; नांदेड घटनेनंतर राहुल गांधींचे टीकास्त्र

- Advertisement -

भाजपाने देशातील अनेक घटनात्मक संस्था या स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या असल्याप्रमाणेच चालवल्या आहेत व देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाचीच आज एक प्रकारे प्रायव्हेट कंपनी झाली आहे. या कंपनीचे खरे संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांना अडगळीत फेकून या कंपनीचा ताबा घेण्यात आला व पक्षावर एक प्रकारे मालकी हक्क प्रस्थापित केला गेला, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी सांगतात त्याप्रमाणे ही कंपनी ‘हम दो और हमारे दो’पुरतीच मर्यादित बनली. या प्रायव्हेट कंपनीस ना धोरण, ना विचारांचे तोरण! अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक व्यापार केंद्रच बनले आहे, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तीन वर्षांसाठी वाघनखं भारतात आणणार, मुंबईत ‘या’ वस्तूसंग्राहलयात ठेवण्यात येणार

काँग्रेसचे, शिवसेनेचे, बीआरएसचे एक घराणे नक्कीच असेल, पण या घराण्यांनी देशाला, समाजाला, शेतकरी, कष्टकरी यांना जे दिले ते तुम्ही गेल्या दहा वर्षांत करू शकलात काय? काँग्रेसच्या घराण्याने जे 70 वर्षांत कमावले ते गेल्या दहा वर्षांत विकून, मोडून खाणे हाच तुमच्या प्रायव्हेट कंपनीचा धंदा बनला. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. शरद पवारांचा हात धरून आपण राजकारणात आलो असे सांगणारे मोदी पुन्हा त्यांच्या परिवारवादावर टीका करतात. पवारांच्या राजकीय परिवारातील प्रफुल्ल पटेल व अजित पवार हे आज मोदींबरोबर आहेत, याकडे अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -