Homeक्राइमInhuman behavior : कोणावर विश्वास ठेवायचा? मदत मागितली त्यांनीच अल्पवयीन मुलीवर केले...

Inhuman behavior : कोणावर विश्वास ठेवायचा? मदत मागितली त्यांनीच अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार…

Subscribe

बालकल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(Inhuman behavior) तिरुवनंतपुरम : केरळमध्ये एका दलित अल्पवयीन मुलीशी जवळच्याच व्यक्तींनी केलेल्या अमानवीय वर्तनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल पाच वर्षे सुमारे 65 जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यात वर्गातील मुलांसह शेजारी, नातेवाईक आणि खेळाचे कोच यांचा समावेश आहे. ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिचा गैरफायदा घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना गजाआड केले आहे. (A minor girl was raped by 65 people for five years in Kerala)

पथानमथिट्टा जिल्ह्यातील एक दलित मुलगी 13 वर्षांची असताना 2019मध्ये शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने तिचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. त्यावेळी तिला समजले नाही की, आपण काय करायला पाहिजे? त्यामुळे ती गप्प राहिली. मग तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मुलाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. तेव्हा त्या मित्रांनीही ब्लॅकमेल करत तिला आपल्या वासनेची शिकार बनवले.

- Advertisement -

हेही वाचा – MP Crime News : लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या, फ्रीज बंद केल्यावर पसरली दुर्गंघी आणि झाला अलगडा

शाळेत क्रीडा संघात सहभागी झाली. हळुहळू तिचा क्रीडा प्रशिक्षकावर खूप विश्वास बसला. त्याच विश्वासाने तिने आपल्यावरील आपबिती प्रशिक्षकाला सांगितली. पण इथेही तिचा विश्वासघात झाला. मदत करण्याऐवजी, प्रशिक्षकानेसुद्धा त्या मुलीवर अत्याचार केले. शेजारच्यांनीही तेच केले. मग पीडित मुलीने आपल्या नातेवाइकांची मदत घ्यायचे ठरवले. मात्र, तिथेही तिची फसगत झाली. नातेवाइकांनीही तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या कोलमडून पडली. जगात विश्वास ठेवण्यासारखे कोणी नाही, असे तिचे मत बनले.

- Advertisement -

महिला सामक्य नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेचे (NGO) सदस्य, नियमित क्षेत्र भेटीचा भाग म्हणून मुलीच्या घरी गेले होती. त्यावेळी तिने अंगावर काटा आणणारी गेल्या पाच वर्षांतील कहाणी ऐकवली. यामुळे हादलेल्या एनजीओने पथानमथिट्टा जिल्ह्यातील बालकल्याण समितीला याची माहिती दिली.

मुलगी दोन महिन्यांपूर्वी 18 वर्षांची झाली. शाळेतील समुपदेशन सत्रादरम्यान पीडित मुलीने पहिल्यांदाच आपल्यावरील लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितल्याची माहिती पठानामथिट्टा बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन. यांनी दिली. बालकल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Inhuman behavior : A minor girl was raped by 65 people for five years in Kerala)

हेही वाचा – Walmik Karad : वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर न्यायालयात खटला; सोने, जमीन-घर बळकावले, मारहाणीची तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -