घरताज्या घडामोडीIndira Gandhi Jayanti: PM Narendra Modi यांच्यासह खर्गे, राहुल-सोनिया गांधींनी वाहिली आदरांजली

Indira Gandhi Jayanti: PM Narendra Modi यांच्यासह खर्गे, राहुल-सोनिया गांधींनी वाहिली आदरांजली

Subscribe

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी आर्यन लेडीला श्रद्धांजली वाहिली. 19 नोव्हेंबर 1917 ला जन्मलेल्या इंदिरा गांधी 1966 ते 1977 आणि नंतर 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या हत्येपर्यंत पंतप्रधान पदावर राहिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाद्वारे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली. ट्विट संदेशात ते म्हणाले, ‘माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली.’

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष खर्गें ‘शक्तीस्थळ’ येथे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंदिरा गांधी यांची समाधी असलेल्या शक्तीस्थळ येथे जाऊन माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले, ‘भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आमच्या आदर्श इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. इंदिरा गांधींनी आपल्या देशाची एकता आणि अंखडात कायम राखण्यासाठी आणि देशाला सशक्त तसेच प्रगतीशील बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका नाभावली.’
खर्गे म्हणाले, ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून कुशल नेतृत्व, देशाप्रती निष्ठा आणि दृढ इच्छाशक्तीचा वारंवार परिचय करुन दिला आणि देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.’

- Advertisement -

 

राहुल – सोनिया गांधींनी शक्ती स्थळ येथे वाहिली आदरांजली

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शक्ती स्थळ येथे जाऊन इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांनी केले अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांना अभिवादन केले. पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, “आपली दूरदृष्टी आणि राजकीय चातुर्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिमा उंचावण्याचं कार्य इंदिरा गांधी यांनी केलं. देशातील गरिबातील गरीब माणसाला आपला स्थर अधिक वाढविण्यासाठी त्यांनी ‘गरिबी हटाव’ चा नारा दिला. देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!”

अरविंद केजरीवाल यांनीही केली पोस्ट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

हेही वाचा : ‘सरकार भगवीकरण करतंय’; क्रिकेट संघाच्या जर्सीवरून ममता बॅनर्जी संतापल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -