घर देश-विदेश मणिपूर हिंसाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत, अमित शाहांची माहिती

मणिपूर हिंसाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत, अमित शाहांची माहिती

Subscribe

मणिपूर हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल. यासाठी शांतता समितीही स्थापन केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार आल्यापासून राज्य विकासाच्याबाबतीत पुढे गेला आहे. मात्र यापूर्वी झालेल्या हिंसक घटनांमध्ये येथे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या हिंसाचाराची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करणार आहेत. शांतता समिती स्थापन केली जात आहे, अशी माहिती यावेळी अमित शाह यांच्याकडून देण्यात आली.

हेही वाचा – Breaking : #Ncp with Champions राष्ट्रवादीची कुस्तीपटूंसाठी मोहीम; जयंत पाटील

- Advertisement -

अमित शहा यांनी इंफाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, “मणिपूरमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून मणिपूर गेल्या सहा वर्षांपासून कर्फ्यू आणि हिंसाचारापासून मुक्त झाले होते. मणिपूरमधील डबल इंजिन सरकारने विकासाच्या सर्व मापदंडांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मणिपूरमध्ये मागील एका महिन्यात हिंसक घटनांमध्ये जे मृत्यूमुखी पडले आहेत अशा नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल पंतप्रधान मोदी, माझ्या वतीने आणि भारत सरकारच्या वतीने मी संवेदना व्यक्त करतो.

गेल्या काही दिवसांत माझी 11 विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी चर्चा केली. महिलांशीही बोललो. तात्पुरत्या शिबिरांना भेटी दिल्या आहेत. नागरिकांचे शिष्टमंडळ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्याही मी बैठका घेतल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी महिला प्रतिनिधी आणि जाणकारांशी चर्चाही झाली आहे. मणिपूर उच्च न्यायालयाच्या 29 एप्रिल रोजी घाईने दिलेल्या निर्णयामुळे येथे दोन गटांमध्ये जातीय हिंसाचार झाला. त्यामुळे दोन्ही गटांकडून शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी काम केले गेले पाहिजे. या घटनेनंतर मदत आणि पुनर्वसन पॅकेजही तयार करण्यात आले आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 5 लाख रुपये आणि मणिपूर सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही रक्कम डीबीटीद्वारे पीडितांना हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती यावेळी अमित शाह यांच्याकडून देण्यात आली.

- Advertisement -

हिंसाचार का झाला? कसा झाला? आणि हिंसाचाराला जबाबदार कोण याची चौकशी करण्यासाठी भारत सरकार उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती स्तरावरील न्यायिक आयोगाची स्थापना करून या सर्व गोष्टींची चौकशी करेल, असे अमित शहा यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. हिंसाचाराच्या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल. त्यातील काही प्रकरणांचा तपास सीबीआय देखील करेल आणि मी मणिपूरच्या जनतेला आश्वासन देतो की हा तपास कोणताही पक्षपात आणि भेदभाव न करता केला जाईल आणि दोषींना शिक्षा करण्यात येईल, असेही अमित शाह म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी मणिपूरच्या सर्व जनतेला आवाहन करतो, कृपया अफवांवर लक्ष देऊ नका आणि राज्यात शांतता राखा. शांततेमुळे गेल्या सहा वर्षांपासून राज्यात विकासाच्या पर्वाला सुरूवात झाली होती. मला सस्पेंशन ऑफ ऑपरेशन ग्रुप (SoO Group) ला सांगायचे आहे की कराराचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन, कोणत्याही प्रकारचे विचलन कठोरपणे विचारात घेतले जाईल आणि तो कराराचा भंग मानला जाईल. कराराच्या अटींचे पालन करा. शस्त्रे जप्त करण्यासाठी पोलीस उद्यापासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार आहेत.

- Advertisment -