घरदेश-विदेशINS Ranvir Explosion: एसी कंपार्टमेंटमधील गॅस गळतीमुळे आयएनएस रणवीरवर झाला स्फोट

INS Ranvir Explosion: एसी कंपार्टमेंटमधील गॅस गळतीमुळे आयएनएस रणवीरवर झाला स्फोट

Subscribe

भारतीय नौदलाच्या आयएनएस रणवीर या युद्धनौकेच्या आतील कंपार्टमेंटमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात नौदलाच्या तीन जवानांनी आपले प्राण गमावले तर 11 जण जखमी झाले. दरम्यान एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एसी कंपार्टनमेंटमधील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असल्याचे म्हटले आहे. स्फोटाच्या वेळी आतील कंपार्टमेंटमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, मात्र प्राण गमावलेले तीन जवान हे त्या कंपार्टमेंटच्या वरच्या बाजूस डेकवर उभे होते. या स्फोटामुळे बराचसा ढिगारा बाहेर पडला असून डेकवरील तीन जवान त्याखाली अडकल्याचे सांगितले जातेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट कोणत्याही दारूगोळ्याने झालेला नाही. आयएनएस रणवीर बराच काळ येथे होती कारण ती सीमापार ऑपरेशनल तैनातीसाठी पूर्व नौदल कमांडकडून आली होती. स्फोटानंतर काही लोक आग विझवण्याच्या प्रयत्नात धावत असताना जमिनीवर पडले. अनेकांच्या नाका-तोंडात गॅस शिरला. यामुळे काहींना किरकोळ दुखापतही झाली आहे.

- Advertisement -

अतिशय दुर्दैवी घटना

त्याचवेळी एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. युद्धनौकेवर अनेक ऑपरेशनल समस्या येत असतात. वातानुकूलित वायू, दारूगोळा आणि पाणी पुरवणाऱ्या अनेक रेषा जहाजाला समांतर चालतात. इतर वाहनांप्रमाणे युद्धनौका ऑपरेशन दरम्यान बंद करता येत नाहीत. आम्ही या सर्व ऑपरेशनल गोष्टी पाहत आहोत. घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

INS रणवीर 1986 मध्ये झाली नौदलात दाखल

INS रणवीर लवकरच पूर्व नौदल कमांडमध्ये परतणार होते. भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीला आदेश देण्यात आला आहे. INS रणवीर ही एक युद्धनौका आहे आणि ती भारतीय नौदलाच्या राजपूत वर्गातील 5 विनाशक जहाजांपैकी चौथे जहाज आहे. ऑक्टोबर 1986 मध्ये ते नौदलात सामील झाले.


Jharkhand Naxalite : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला: 15 IED कुकर बॉम्ब जप्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -