नौदलात शक्तिशाली ‘INS विशाखापट्टनम’ एंट्री; जाणून घ्या वैशिष्ट्ये

ins visakhapatnam commissioned in mumbai to navvy
नौदलात शक्तिशाली 'INS विशाखापट्टनम' एंट्री; जाणून घ्या वैशिष्ट्ये

भारतीय नौदलात शक्तिशाली आयएनएस विशाखापट्टनम (INS Visakhapatnam) सामील झाले आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात यासंबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात आली. तसेच नौदल प्रमुख कमांडर यांच्या उपस्थितीत सेवेत आयएनएस विशाखापट्टनमला सामील केले गेले. या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थितीत झाले. यानिमित्ताने राजनाथ सिंह म्हणाले की, भारत लवकरच संपूर्ण जगासाठी जहाज निर्माण करेल.

तसेच राजनाथ सिंह यांनी यावेळी चीनवर निशाणा साधत म्हटले की, काही वर्चस्ववादी प्रवत्ती असलेले बेजबाबदार देश त्यांच्या संकुचित पक्षपाती हितसंबंधांमुळे संयुक्त राष्ट्र संमेलनचा (युएनसीएलओएस) चुकीचा अर्थ लावत आहे. ही चितेंची बाब आहे. काही बेजबाबदार देश त्यांच्या वर्चस्ववादी आणि संकुचित पक्षपाती हितसंबंधांसह आंतरराष्ट्रीय कायद्याचा चुकीचा अर्थ लावत आहेत.

काय आहेत ‘INS विशाखापट्टनम’ वैशिष्ट्ये

  • आयएनएस विशाखापट्टनमच्या बांधकामबद्दल बोलायचे झाले तर, याची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि एकूण वजन ७४०० टन आहे. यामध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे स्वदेशी आहेत.
  • याची डिझाईन नेव्हीच्या नौदल रचना संचालनालय केली आहे. तर बांधकाम मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटे (एमडीएल) मध्ये झाले आहे.
  • महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे आयएनएस विशाखापट्टनम शत्रू देशाचे रडार ट्रेस करू शकत नाही. कारण बाह्य पृष्ठभाग एका विशेष स्टील धातूपासून तयार करण्यात आला आहे.
  • यामध्ये मीडियम रेंज सर्फेस टू एअर मिसाईल, सतत हल्ला करणारे ब्रह्मोस, एलअँडटी कंपनीचे टोरपीडो ट्यूब लाँचर, एलअँडटीचे अँटी सबमरीन रॉकेट लाँचर आणि बीएचईएलचे ७६ एमएम सुपर रॅपिड गन आहे.
  • आयएनएस विशाखापट्टनम शत्रूचे जहाज पाहताच आपल्या डेकमधून अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल लाँच करण्यास सक्षम आहे.
  • या युद्धनौकेत टॉरपीडो ट्यूब आणि लाँचर, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, सुपर रॅपिड गन माउंड व्यतिरिक्त कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, इंटिग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनजमेंट सिस्टम लावले गेले आहे.