घरताज्या घडामोडीनवीन संसद भवनातील लोकसभेचे सभागृह तयार; अर्थसंकल्प इथेच मांडणार?

नवीन संसद भवनातील लोकसभेचे सभागृह तयार; अर्थसंकल्प इथेच मांडणार?

Subscribe

नवीन संसद भवनातील लोकसभेचे सभागृह तयार झाले आहे. या सभागृहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवीन संसद भवनातील लोकसभेचे सभागृह तयार झाले आहे. या सभागृहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. (inside picture of new lok sabha hall president address likely to be held in new parliament)

केद्रीय अर्थसंकल्प 2023-24 याच सभागृहात मांडला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लोकसभेचे सभागृह अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.

‘असे’ आहे नवीन संसद भवन

- Advertisement -
  • नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनापेक्षा मोठे, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
  • 64,500 चौरस मीटरमध्ये बांधले जाणारे नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट करत आहे.
  • संसद भवनाच्या नवीन इमारतीमध्ये दृकश्राव्य प्रणाली तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
  • संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची सोय आहे. म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात.
  • लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतात.
  • नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल असणार नाही.
  • दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे.
  • नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.
  • संसदेच्या नवीन इमारतीत लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे.
  • या इमारतीचे डिझाइन ‘HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ने तयार केले आहे.
  • नवीन चार मजली संसद भवन बांधण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

हेही वाचा – निवडणुकीचं बिगुल : पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर कोट्यवधींच्या योजनांची बरसात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -