घरट्रेंडिंगबापरे! इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होतायत; आता मेसेज पाठवण्यात येणार अडचणी

बापरे! इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होतायत; आता मेसेज पाठवण्यात येणार अडचणी

Subscribe

मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सना दुपारी 1 वाजता हा अलर्ट मिळालाय. काही युजर्सनी यामागचे कारण म्हणून अॅपवर एक प्रकारची समस्या असल्याचे मानले, तर अनेकांना ते पाहून आश्चर्य वाटले

नवी दिल्लीः बहुतेक सोशल मीडिया साइट्स इन्स्टाग्राम युजर्सनी भरल्या आहेत. यामुळेच त्यांना अचानक त्यांचे खाते निलंबित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. युजर्स सोशल मीडियावर या अलर्टचा फोटोही शेअर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सना दुपारी 1 वाजता हा अलर्ट मिळालाय. काही युजर्सनी यामागचे कारण म्हणून अॅपवर एक प्रकारची समस्या असल्याचे मानले, तर अनेकांना ते पाहून आश्चर्य वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना अलर्टसह सांगण्यात आले होते की, त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, त्यानंतर त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. हा इशारा हजारो युजर्सपर्यंत पोहोचला आहे. सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गोष्टी बंद केल्या जात असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनेही नियमांचं भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने आयटी नियम अधिक कठोर केले असून हे नियम सर्व सोशल मीडिया कंपन्यांना पाळणं बंधनकारक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यापुढे अल्गोरिदमच्या नावाखाली मनमानी करू शकणार नाहीत. नवीन आयटी नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. नवीन IT नियमांच्या अधिसूचनेनुसार, 90 दिवसांत तक्रारींचं निवारण करावं लागणार आहे. तसेच 24 तासांच्या आत संवेदनशील मजकुरावर कारवाई करावी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचाः भूकंपाच्या धक्क्याने डहाणू व तलासरी तालुके हादरले

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -