गेल्या १६ तासांपासून इन्स्टाग्राम डाऊन, नेटिझन्स नाराज

मेटा कंपनीच्या मालकीच्या या दोन्ही कंपन्या असून गेल्या १६ तासांपासून नेटीझन्सना मेसेजेससाठी अडचणी येत असल्याचं सांगण्यात येतंय. मंगळवारी सायंकाळपासून जगभरात इन्स्टाग्राम डाऊन आहे.

instagram now lets you recover deleted posts

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यल्प काळात लोकप्रिय ठरलेले इन्स्टाग्राम अॅप जगभरात डाऊन झाले आहे. तसेच, फेसबूक मॅसेंजरही डाऊन झाल्याचं नेटिझन्स सांगत आहेत. मेटा कंपनीच्या मालकीच्या या दोन्ही कंपन्या असून गेल्या १६ तासांपासून नेटिझन्सना मेसेजेससाठी अडचणी येत असल्याचं सांगण्यात येतंय. मंगळवारी सायंकाळपासून जगभरात इन्स्टाग्राम डाऊन आहे. (Instagram Down for last 16 hrs in world wide)

हेही वाचा – Instagram Users : इन्स्टाग्राम युजर्सने पार केला २ बिलियन युजर्सचा आकडा

ट्विटवर मिळालेल्या तक्रारींनुसार, युजर्सने पाठवलेले मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाहीयेत. शिवाय मेसेज थेट डिलिट अथवा गायब होत आहेत. मंगळवारपासून हे सुरू असून काही युजर्सच्या अद्यापही समस्या सुटलेल्या नहाीत. त्यामुळे अनेकांनी ट्विटरवर #instagramdown म्हणून हॅशटॅग ट्रेन्ड केला आहे.


५ जुलै रात्री आठ वाजल्यापासून इन्स्टाग्राम आणि फेसबूक मॅसेंजरवर असे अडथळे येत असल्याची माहिती वेबसाईट सर्व्हिसेस ट्रॅकर डाऊन डिटेक्टरकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, या #instagramdown मध्ये केवळ मॅसेजिंगसाठीच अडचणी येत आहेत. इतर सर्व फिचर्स व्यवस्थित सुरू असल्याचंही नेटीझन्सन सांगत आहेत.