घर ट्रेंडिंग जगभरात इन्स्टाग्राम डाऊन, रिफ्रेश आणि लॉगइनच्या समस्येमुळे नेटकरी हैराण

जगभरात इन्स्टाग्राम डाऊन, रिफ्रेश आणि लॉगइनच्या समस्येमुळे नेटकरी हैराण

Subscribe

Instagram Down | सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आज सकाळपासून डाऊन झाले आहे. आऊटेज ट्रॅकिंग वेबसाईट डाऊन डिटेक्टरवर जवळपास २७ हजार लोकांनी तक्रारी केल्या आहेत. ५० टक्के लोकांना इन्स्टाग्रामच्या अॅप आणि वेबसाईटवर दोन्ही ठिकाणी खातं अॅक्सेक करण्यात अडचणी येत आहेत. तर, २० टक्के लोकांना लागइनच्या समस्या येत आहेत.

सकाळी सात वाजल्यापासून इन्स्टाग्राम युजर्सना फिड रिफ्रेश करताना अडचणी येत होत्या. तसंच, काहींना लॉगइन करता येत नव्हतं. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्स क्रॅश किंवा डाउन होण्याच्या घटनांचा मागोवा घेणारी वेबसाइट डाऊन डिटेक्टरवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेक युजर्सकडून ट्वीटरवरही तक्रारी केल्या. दरम्यान, इन्स्टाग्रामकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -