घर अर्थजगत LIC च्या शेअर धारकांना मिळणार आनंदाची बातमी; नुकसानभरपाईसाठी कंपनीने काढली 'ही' योजना

LIC च्या शेअर धारकांना मिळणार आनंदाची बातमी; नुकसानभरपाईसाठी कंपनीने काढली ‘ही’ योजना

Subscribe

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली LIC कंपनी त्यांच्या शेअर्सच्या घसरत्या मूल्याला आधार देण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे.

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली LIC कंपनी त्यांच्या शेअर्सच्या घसरत्या मूल्याला आधार देण्यासाठी एका नवीन योजनेवर काम करत आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) लाभांश देण्यासाठी किंवा बोनस शेअर्स जारी करण्यासाठी 1.8 लाख कोटी रुपयांचे लाभांश आणि बोनस शेअर्स जारी करण्याचा विचार करत आहे. (insurance LIC plans bonus shares and higher dividend to investors)

अलीकडच्या काळात एलआयसीच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एलआयसीच्या शेअर्सची किंमत 949 रुपये होती, परंतु सध्या ते 600 रुपयांच्या खाली आले आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून LIC कंपनी आपल्या समभागांच्या किमतीत सुधारणा करून गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवते.

- Advertisement -

सरकारी मालकीची विमा कंपनी मे महिन्यात भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाली होती. परंतु, या कंपनीचा स्टॉक 35 टक्यांपेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.23 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आता कंपनी आपले शेअर्स मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तोट्यात गेलेल्या गुंतवणूकदारांना कितपत आणि किती दिलासा देणार हा मोठा प्रश्न आहे.

LIC ची योजना काय ?

- Advertisement -

एलआयसी आता आपल्या शेअर्सची किंमत सुधारण्यासाठी पावले उचलण्याचा विचार करत आहे.
LIC ची योजना गैर-सहभागी निधीतून भागधारकांना 1.8 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्याची योजना आहे.
कंपनीचा गैर-सहभागी निधी सुमारे 11.57 लाख कोटी रुपये आहे.

सहभागी आणि गैर-सहभागी निधी म्हणजे काय?

जीवन विमा कंपन्या प्रामुख्याने दोन प्रकारची उत्पादने विकतात, एक सहभागी आणि दुसरी गैर-सहभागी. सहभागी फंडाचा नफा ग्राहकांसोबत शेअर केला जातो तर नॉन-पार्टिसिपेटेड फंड निश्चित परतावा देतो. एलआयसी आपला प्रीमियम नॉन-पार्टीटींग फंडात ठेवते.

गुंतवणूकदारांचा विश्वास परत येईल का?

गैर-सहभागी निधीमधून भागधारकांच्या निधीमध्ये निधी हस्तांतरित करणे हा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक मार्ग आहे. गैर-सहभागी निधी हस्तांतरित केल्यामुळे विमा कंपनीची नेट वर्थ 18 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदारांनाही मजबूत परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. एलआयसी शेअर्सची किंमत 949 रुपये प्रति शेअर होती, परंतु सध्या ते 600 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत.


हेही वाचा – राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती लांबणीवर, पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -