दहावी पास आहात? मग Intelligence Bureau मध्ये नोकरी मिळू शकते

दहावी पास असलेल्यांसाठी गुप्तचर खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Intelligence Bureau IB Recruitment 2018 1054 post Vacancy

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. Intelligence Bureau मध्ये १०५४ पदांची बंपर भरती निघाली आहे. सहायक आणि कार्यकारी पदांसाठी ब्युरोकडून जाहीरात काढण्यात आली आहे. शनिवार २० ऑक्टोबर पासून रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारिख १० नोव्हेंबर आहे. मात्र अद्याप यासंबंधी परिक्षा कधी होईल, त्याचे वेळापत्रक झालेले नाही.

अर्ज करणाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज कधीपासून भरायचा – २० ऑक्टोबर पासून

अर्ज भरण्याची शेवटची तारिख – १० नोव्हेंबर

अर्जासोबत फी जमा करण्याची अंतिम तारिख – १३ नोव्हेंबर

इच्छूक उमेदवार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in

कोणाला अर्ज करता येईल –

Intelligence Bureau साठी कोणत्याही बोर्डाची दहावीची परिक्षा पास असणे गरजेचे आहे. तसेच जाहीरातीमध्ये नमूद केलेल्यापैकी एका स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा २७ आहे. तर आरक्षित वर्गांकरीता त्या त्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा ठरवलेली आहे.


हे देखील वाचा – दहावीनंतर पॉलिटेक्निकचा सुयोग्य पर्याय

 

अर्जासोबत परिक्षा शुल्क किती असेल –

या भरतीसाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० रुपये शुल्क असणार आहे. अनुसूचित जाती आणि जमाती, माजी सैनिक आणि मुलींसाठी परिक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एका दिवसाच्या अंतराने शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरुपात शुल्क भरता येणार आहे.

परिक्षा कशी असेल –

भाग १ – लिखित परिक्षा होईल, ज्यामध्ये बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न असतील

भाग २ – वर्णनात्मक (Descriptive) स्वरुपाची परिक्षा होईल.

भाग ३ – मुलाखत घेतली जाईल.

हे वाचा – हाती लिहीला नोकरीचा अर्ज, बदलून गेले त्याचे नशीब

IB Recruitment
परिक्षेचा पॅटर्न