घरदेश-विदेशवैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर! सर्व परिवहन सुविधा एकाच टर्मिनलमध्ये, इंटर मॉडेल स्टेशन...

वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर! सर्व परिवहन सुविधा एकाच टर्मिनलमध्ये, इंटर मॉडेल स्टेशन उभारणार

Subscribe

श्रीनगर – राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (National Highway Logistic Management Limited) आणि कटरा विकास प्राधिकरणाने (Katra Development Authority) देश-विदेशातून येणाऱ्या माता वैष्णो देवीच्या (Vaishno Devi Temple) भक्तांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भक्तांना प्रवासासाठी सोयीचं पडावं याकरता इंटल मॉडेल स्टेशन (Inter Model Station) विकसित करण्यात येणार आहे. यामुळे भक्तांना रेल्वे, विमान, बस, ऑटो, रिक्षा, टॅक्सी आणि इतर परिवहन साधनांसाठी एकच टर्मिनल तयार केलं जाणार आहे. यामुळे भाविकांना सर्व वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होतील.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा गंभीर आरोप

- Advertisement -

मंगळवारी एनएचएलएमएल आणि केडीए यांच्यामधील सांमजस्य करारावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री वीके सिंहसुद्धा उपस्थित होते. माता वैष्णो देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुधारण्यासाठी कटरा येथे इंटर मॉडेल स्टेशन विकसित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रवासी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी देशभरात इंटर मॉडेल स्टेशन विकसित करत आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा – आम्हाला टार्गेट केलं जातंय; सोनिया गांधींचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

- Advertisement -

प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन हे रेल्वे, रस्ता, हवाई (हेलिपॅड), बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहने एकाच ठिकाणी किंवा हबद्वारे वाहतुकीच्या विविध पद्धती एकत्रित करून विकसित केले जाणारे टर्मिनल असेल जेणेकरुन लोकांना सुखकर प्रवास करता येईल. याशिवाय, हे टर्मिनल व्यावसायिक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देईल आणि कटरा आणि त्याच्या आसपासच्या भागातील सामाजिक-आर्थिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा करेल तसेच पर्यटनाला चालना देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -