घरताज्या घडामोडीInternational Day of Peace 2021: आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या...

International Day of Peace 2021: आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून

Subscribe

२१ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जगभरातील लोकांमध्ये परस्परांविषयी प्रेमाची आणि मानवतेची भावना जपण्यासाठी साजरा केला जातो. तसेच मानवतेला मतभेदांपेक्षा शांततेत वचनबद्ध होण्यासाठी आणि शांतीची संस्कृती वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोकांमध्ये आपण एकमेकांचे शत्रू नाही अशी जागरुकता पसरवली जाते. शांततेला प्रोत्साहन देणे आणि परस्परातील वाद मिटवणे हा मुख्य उद्देश शांतता दिवस साजरा करण्यामागचा आहे.

संयुक्त राष्ट्राने जगभरातील देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय युद्ध संपवण्यासाठी आणि देशांमध्ये बंधुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाची घोषणा केली होती. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने पहिल्यांदा १९८१ मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर दरवर्षीय यादिवशी शांतता दिवस साजरा करू लागले. आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाच्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेप्रमाणे अनेक इतर संघटना काही कार्यक्रम आयोजित करतात.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा इतिहास

संयुक्त राष्ट्राने १९८१ मध्ये जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. ज्यानंतर पहिल्यांदा १९९२मध्ये सप्टेंबरमध्ये तिसऱ्या मंगळवारी साजरा केला होता. मग त्यानंतर १९८२ पासून ते २००१ पर्यंत आंतरराष्ट्रीय शांतता दिवस सप्टेंबर महिन्यांच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्राने २००२मध्ये २१ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता दरवर्षी २१ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करू लागले.

आंतरराष्ट्रीय शांतता दिनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये दरवर्षी शांततेची घंटा वाजवली जाते. ही घंटा आफ्रिका सोडून सर्व खंडातील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून तयार केली आहे. तसेच जपानच्या संयुक्त राष्ट्र संघाकडून युद्धामध्ये मारले गेलेल्या लोकांची आठवण म्हणून ही भेट दिली होती.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे महत्त्व

संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याची थीम जाहीर केली आहे. ‘समान आणि शाश्वत जगासाठी उत्तम पुनर्प्राप्ती’ अशी या दिवसाची थीम आहे. कोरोना महामारीवर लक्ष केंद्रित करत संयुक्त राष्ट्र म्हणाले की, ‘महामारीच्या या काळात दया, आशा आणि करुणेने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करा. तसेच भेदभाव किंवा द्वेष संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या पाठीशी उभे रहा.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -