घरदेश-विदेशInternational Earth Day 2021: गुगलचे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष डूडल

International Earth Day 2021: गुगलचे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष डूडल

Subscribe

डूडलच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जागरूक करण्यात आले

जगभरामध्ये २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिवस’ म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये ‘जागतिक अर्थ डे’ म्हणून अंतराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. आपण आपल्या पृथ्वीची पर्यावरणाशिवाय कल्पनाच करू शकत नाही नैसर्गिक देणगी असलेली पृथ्वी सजीवसृष्टीवर भरभरून प्रेम करते आणि याच खास दिवसाच अवचित्त साधून गुगल ने ‘Restore Our Earth’ या थीम अंतर्गत ५१ वा अर्थ डे साजरा केला आहे. गुगल ने त्याच्या डूडलच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जागरूक करण्यात आले आहे.
गूगल नेहमी खास दिवस असो किंवा एखाद्या खास व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी खास डूडल बनवतो. आणि आज जागतिक वसुंधरा दिवसासाठी गूगलने प्रत्येक व्यक्ती एक झाड लावून कशा प्रकारे भावी आयुष्यात सुखी जीवनाचे बिजारोपण करू शकतो असा महत्वपूर्ण संदेश यातून दिला आहे.

- Advertisement -

सध्या सर्व जगामध्ये कोरोना व्हायरसने माजवलेला हाहाकार पाहता अनेकांना आपसूकच पर्यावरणाचे महत्व पटले आहे. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवावी लागेल प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे त्याला वाढवले पाहिजे नाही तर आपण निसर्गाचे रौद्र रूप अतिशय भयंकर आहे हे आपण आता घडणार्‍य घटनेवरून अनुभवतच आहोत.

जागतिक वसुंधरा दिवसाची सुरुवात कशी झाली

- Advertisement -

पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी जुलियन कोनिग ने १९६९ मध्ये केलेल्या आंदोलनाला वसुंधरा दिवस हे नाव देण्यात आलं. १९७० साली पाहिल्यांदा वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला होता.


हे हि वाचा – कोरोना लस घेणाऱ्या १० हजारांपैकी फक्त २ ते ४ जण पॉझिटिव्ह- आयसीएमआर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -