घरताज्या घडामोडीउद्यापासून आंतरराष्ट्रीय विमाने सुरू, 'या' आहेत गाईडलाईन्स

उद्यापासून आंतरराष्ट्रीय विमाने सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स

Subscribe

देशातील कोरोना संसर्गाची प्रकरणं कमी होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र उद्यापासून हे निर्बंध संपुष्टात येणार आहेत. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

हे आहेत नवीन गाईडलाईन्स

१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानातील ३ आसनं रिक्त ठेवण्यावरील निर्बंध काढण्यात आले आहेत.

२) कोरोना रूग्णांचा वाढता आलेख कमी झाल्यानंतर क्रू मेंबर्ससाठी पीपीई किटची लागणारी गरज संपुष्टात आणली आहेत.

- Advertisement -

३) विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या पॅट-डाऊनच्या चौकशीला सुरूवात करण्यात येणार आहे.

४) विमानतळावर आणि विमानात प्रवास करताना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे.

केव्हा सुरू झाल्या होत्या कॉमर्शियल फ्लाईट्स

कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २३ मार्च २०२० पासून भारतातील आंतरराष्ट्रीय कॉमर्शियल फ्लाईट्सला स्थगिती देण्यात आली होती. परंतु लसीकरणात झालेली वाढ आणि कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, पुढील दोन महिन्यांमध्ये हवाई वाहतूक सेवा कोरोनाच्या आधी ज्याप्रकारे होती. त्याच प्रकारे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Sunday Streets : मुंबई पोलिसांची ‘संडेस्ट्रीट’ संकल्पना, मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी संजय पांडेंचा मोठा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -