घर देश-विदेश China New Map : ड्रॅगनची नवी कुरापत; नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश, तैवानसह...

China New Map : ड्रॅगनची नवी कुरापत; नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश, तैवानसह ‘या’ भागांवरही दाखवला हक्क

Subscribe

भारतविरुद्ध चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. चीन सरकारने नव्याने एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातील काही भाग चीनमध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आलं आहे.

भारतविरुद्ध चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. चीन सरकारने नव्याने एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातील काही भाग चीनमध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. चीन सातत्याने भारताच्या भूभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, यावेळी चीननं नकाशाद्वारे भारताचा काही भाग गिळला आहे. भारतानं अनेकदा अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असून कायम राहणार आहे, असं स्पष्ट केलं आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्वीटरवर चीनने 2023 चा बनवलेला नकाशा शेअर केला आहे. (International news China New Map China New Map In the new map Arunachal Pradesh along with Taiwan are also claimed over many areas)

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या प्राकृतिक संसाधन मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेलं हे मानक मानचिन्ह आणि चीनचा हा नकाशा मंत्रालयाच्या वेबसाईटवरही दिसत आहे. चीनच्या या नकाशात दिसणाऱ्या राष्ट्रीय सीमा या कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच दर्शवण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. जोन्हान्सबर्ग येथील ब्रीक्स देशांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्रम मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग यांनी एकमेकांची भेट घेतल्यानंतर एका आठवड्यामध्येच चीनने नकाशाच्या माध्यमातून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या नकाशामध्ये भारताचा काही भाग चिनी भूभाग म्हणून दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता असून त्याआधीच हा नकाशा जारी करण्यात आला आहे. या नकाशामध्ये केवळ भूभागच नाही तर समुद्रातील सीमाही चीननं वाढवून दाखवल्या आहेत. जगभरामध्ये -9 डॅश लाइन नावाने ओळखली जाणारी चीनची समुद्रातील सीमा ही 1940 दशकामध्ये निश्चित करण्यात आली होती. यू आकारातील ही रेषा 90 टक्के भाग चीनचा असल्याचा दावा करते. मात्र, चीनचा हा दावा संयुक्त राष्ट्र कनव्हेंशनच्या विरोधात आहे.

याआधी चीनने एप्रिल 2023 मध्ये आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या 11 जागांचं नामकरण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत चीनने असा प्रकार तीनवेळा केला आहे. याआधी 2021 मध्ये चीनने 15 जागांचे तर 2017 मध्ये सहा जागांचं नामकरण केलं होतं.

- Advertisement -

(हेही वाचा: हिंमत असेल तर केंद्र सरकारने चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावे; संजय राऊतांचे आव्हान, काय आहे कारण? )

- Advertisment -