Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशInternational News : सौदीत जाऊन भीक मागणाऱ्या नागरिकांना चाप, पाकिस्तानने उचलले हे...

International News : सौदीत जाऊन भीक मागणाऱ्या नागरिकांना चाप, पाकिस्तानने उचलले हे पाऊल

Subscribe

जवळपास 4300 भिकाऱ्यांची यादी सौदी अरेबियाने तयार केली असून त्यांना देशाबाहेर हाकलून देण्याची तयारी सुरू असल्याचे तेथील प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातील शहबाज शरीफ यांच्या सरकारने प्रवाशांसाठी अनेक नवीन नियम लागू केले आहेत.

(International News) इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात महागाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक इतर देशांमध्ये जाऊन भिक मागत असल्याचे समोर आला आहे. सौदी अरेबियाच्या शहरांमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या इतकी वाढल्याने अलीकडेच मोठ्या प्रमाणात त्यांना देशातून हाकलण्यात आले. यामुळे पाकिस्तान सरकारही गंभीर झाले असून तेथील सरकारने नवे नियम लागू केले आहेत. (Pakistan’s new rules to prevent citizens from going to Saudi Arabia to beg)

पाकिस्तानचे अनेक नागरिक पर्यटक म्हणून आखाती देशांमध्ये जातात आणि नंतर तेथे भीक मागू लागतात. हे नागरिक उमरा व्हिसावर झियारतच्या (तीर्थयात्रा) नावाखाली परदेशात जातात आणि नंतर रस्त्यावर भीक मागत असल्याचे उघड झाले होते. मध्यंतरी पश्चिम आशियाई देशांमध्ये भीक मागणारे मोठ्या संख्येने तुरुंगात असून त्यात 90 टक्के लोक पाकिस्तानचे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पर्यटकांच्या वेशात देश सोडून जाणाऱ्या भिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी आखाती देशांमध्ये जाणाऱ्या विमानांमधील सुरक्षारक्षक तपासणी करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Kerala case : एफआयआर असला तरी सरकारी नोकरी नाकारता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

जवळपास 4300 भिकाऱ्यांची यादी सौदी अरेबियाने तयार केली असून त्यांना देशाबाहेर हाकलून देण्याची तयारी सुरू असल्याचे तेथील प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातील शहबाज शरीफ यांच्या सरकारने प्रवाशांसाठी अनेक नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार, सौदी अरेबियात जाऊन भीक मागणार नाही, असे प्रतिज्ञापत्रच लोकांना तिथे जाण्यापूर्वी द्यावे लागेल, असे पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

- Advertisement -

याशिवाय, प्रवाशांना ग्रुप तयार करून प्रवास करावा लागणार आहे. लोक ग्रुपने जातील, तेव्हा ते भीक मागणार नाहीत्, असे पाकिस्तानी सरकारला वाटते. तसेच, आपल्या क्लायंटकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची जबाबदारीही टूर ऑपरेटरची असेल. एखाद्या कंपनीने तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी अवैधरीत्या उमराह व्हिसा देणाऱ्या एजन्सींवरही कारवाई सुरू केली आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आता तिथल्या अनेक नागरिकांना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत पडली आहे. कदाचित त्यामुळेच पाकिस्तान आता भिकाऱ्यांचा निर्यातदार बनला आहे. गेल्या अडीच वर्षांत पर्यटक असल्याचे भासवत आखाती देशांमध्ये भीक मागण्यासाठी जाणाऱ्या 44 हजार प्रवाशांना विमानातून खाली उतरविल्याचा दावा, पाकिस्तान सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला केला होता. (International News: Pakistan’s new rules to prevent citizens from going to Saudi Arabia to beg)

हेही वाचा – Mumbai News : अखेर त्या वकिलांना न्याय मिळाला, 15 वर्षांनंतर आरोपीचा शिक्का पुसला गेला


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -