International Tiger Day: भारताच्या १४ व्याघ्र प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन

देशात ८ राज्यातून एकूण १४ व्याघ्र प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.

International Tiger Day: 14 tiger reserves set global standard tiger conservation in India
International Tiger Day: भारताच्या १४ व्याघ्र प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन

दरवर्षी २९ जुलै रोजी वाघांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन (International Tiger Day)  साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवाऱ्यांचे संरक्षण करणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे या दिवसामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारतातील ५१ व्याघ्र प्रकल्पांपैकी १४ व्याघ्र प्रकल्पांना जागतिक स्थरावर संवर्धन देण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. (International Tiger Day: 14 tiger reserves set global standard tiger conservation in India ) जागतिक पातळीवर व्याघ्र प्रकल्पांचे निकष ठरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय समितीच्या सदस्यांच्या कॅट CATS ( conservation Assured Tiger Standards) कडून या व्याघ्र प्रकल्पांचा आंतरराष्ट्रीय दर्जा ठरवण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पांचे विविध निकषांवर आधारीत मूल्यांकन करण्याचे काम  CATS च्या माध्यमातून करण्यात येते. व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन, पर्यटनाची स्थिती, सुरक्षा व्यवस्था, व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणाचे महत्त्व आणि व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या हे निकष व्याघ्र प्रकल्पांचा दर्जा ठरवण्यासठी महत्वाचे असते. भारतातील ५१ पैकी १४ व्याघ्र प्रकल्पांनी हे आंतरराष्ट्रीय पातळीचे निकष गाठले आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पांच्या निमित्ताने भारताची मान आणखी उंचावणार आहे.

भारतातील ५१ व्याघ्र प्रकल्पात देशातील विविध भागातील व्याघ्र प्रकल्पांपैकी हे १४ व्याघ्र प्रकल्प आहेत. देशात ८ राज्यातून एकूण १४ व्याघ्र प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये आसाम राज्यातील मानस, काझीरंगा आणि ओरंग या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन , बिहार राज्यातील वाल्मिकी आणि उत्तर प्रदेशातील डुधवा व्याघ्र प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील पन्ना, कान्हा, सातपुडा तर महाराष्ट्र राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांचा यात समावेश आहे. तमिळनाडूमधील अनामलाई आणि मुदुमलाई तर केरळ राज्यातील परंबीकुलम आणि कर्नाटक राज्यातील बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे संवर्धन करण्यात आले आहे. २०१३ साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली  होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) च्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा  किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे.

ग्लोबल टायगर फोरम आणि वर्ल्ड लाइफ फंड इंडिया या दोन आंतरराष्ट्रीय संस्था व्याघ्र संवर्धनासाठी काम करतात. त्याचबरोबर कॅटस सोबत ते व्याघ्र संवर्धवन प्राधिकरणाचे भागीदारीत काम करतात. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी असे म्हटले आहे की, देशातील ५१ व्याघ्र प्रकल्पांचे जागतिक संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केवळ वाघांचे संवर्धन नाही तर संपूर्ण इकोसिस्टीमचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. वाघ हे आपले प्रतिक आहे. भौगोलिक तसेच वाघांचे लँडस्केप आणि व्याघ्र कॉरीडोर यांचे देखील संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणात होणाऱ्या बदलांविषयी देखील आपण सावधान असणे गरजेचे आहे. निसर्गाची संवेदनशीलता वाढवण्यासाठी इको टुरिझम वाढवणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – केंद्राने Covishield आणि Covaxin च्या किंमतीत केली वाढ, जाणून घ्या नवे दर