घरदेश-विदेशInternational Whisky Day 2023 : तुम्ही देखील व्हिस्की प्रेमी आहात? जाणून घ्या...

International Whisky Day 2023 : तुम्ही देखील व्हिस्की प्रेमी आहात? जाणून घ्या ‘हे’ फायदे-तोटे

Subscribe

प्रत्येकवर्षी 27 मार्च रोजी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय व्हिस्की दिवस साजरा केला जातो. व्हिस्की हे एक लोकप्रिय आणि सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. मागील अनेक शतकांपासून लोक आवड म्हणून किंवा काही शारीरिक समस्या दूर करण्यासाठी व्हिस्कीचा आस्वाद घेतात. त्यामुळे जगभरात व्हिस्कीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिस्कीचे कौतुक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्हिस्की दिवस घोषित करण्यात आला.

असं म्हणतात की, व्हिस्की आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र, तिचा अती वापर केल्यास ती शरीरासाठी घातक देखील ठरु शकते.

- Advertisement -

व्हिस्की पिण्याचे दुष्परिणाम

International Whisky Day 2023: जानें जरूरत से ज्यादा व्हिस्की पीने के क्या नुकसान हैं

  • व्हिस्कीचे अतिप्रमाणात सेवन केल्याने यकृताला हानी पोहोचते.
  • व्हिस्कीच्या अतिसेवनामुळे तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते. ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
  • व्हिस्कीच्या अतिसेवनामुळे कर्करोगाची समस्या उद्भवते. ज्यामध्ये तुम्हाला यकृतष, घसा किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

व्हिस्की पिण्याचे फायदे

  • पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि पोटाच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी व्हिस्कीचा वापर केला जातो.
  • व्हिस्कीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात.
  • व्हिस्कीचे थोड्याप्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हेही वाचा :

1 एप्रिलपासून सामान्यांना बसणार महागाईची झळ, CNG-PNG दरांबाबत मोठी अपडेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -