घरताज्या घडामोडीSBI Alert: पुढील २ दिवसांसाठी बंद राहणार इंटरनेट बँकिंग सेवा, जाणून घ्या...

SBI Alert: पुढील २ दिवसांसाठी बंद राहणार इंटरनेट बँकिंग सेवा, जाणून घ्या कारण?

Subscribe

भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने (SBI) एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यामुळे SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. SBIच्या ग्राहकांना पुढील दोन दिवसांसाठी बँकिग सेवा बंद राहणार आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी एकूण ३०० मिनिटांसाठी इंटरनेटची बँकिंग सेवा बंद करण्यात येणार आहे. यामुळे इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाईट, यूपीआय यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत.

SBIने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलयं की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की, ग्राहकांसाठी आम्ही चांगल्या बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ११ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ११.२० ते १२ डिसेंबर रोजी पहाटे ४.०० वाजपेर्यंत काम करणार आहोत. या कालावधी दरम्यान तुमचा INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI इत्यादी सेवा बंद राहतील. गैरसोयीबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

५७८८९ पेक्षा जास्त एटीएम

SBI चे देशभरात २२ हजारांपेक्षा जास्त शाखा आणि ५७ हजारांपेक्षा जास्त ATM असलेले सर्वात मोठे नेटवर्क आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल व्यवहारांबाबत त्यांनी म्हटलंय की, ग्राहकांकडून डिजिटल व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. UPI चा वापर करून तुम्ही तुमचे पेमेन्ट्स करू शकता.

- Advertisement -

आयआयटीच्या एका अभ्यासातून समोर आलंय की, भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी संस्था SBI ने २०१७ ते सप्टेंबर २०२० दरम्यान जन धन खातेधारकांकडून १६४ कोटी रूपयांची फी घेतली आहे. या खातेदारांना UPI आणि Rupay कार्डद्वारे व्यवहारांसाठी १६४ कोटींपैकी बँकेने फक्त ९० कोटी रुपये परत केले आहेत. मात्र, बँकेने प्रत्येक खातेदाराकडून १७.७० रूपये वसूल केले आहेत.


हेही वाचा: LIC Kanyadan Scheme : मुलीच्या लग्नासाठी LIC कडून नवीन स्कीम, १५१ रुपये भरा आणि ३१ लाख मिळवा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -