घरताज्या घडामोडीयासीन मलिकच्या शिक्षेवेळी सुरक्षा दलावर दगडफेक, श्रीनगरमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंद

यासीन मलिकच्या शिक्षेवेळी सुरक्षा दलावर दगडफेक, श्रीनगरमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंद

Subscribe

यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) दहशतवादी फंडिंग प्रकरणात ( terror funding case) एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्पठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. विशेष एनआयए न्यायालयात (NIA court) बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. परंतु, यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी काश्मीरच्या श्रीनगरमधील मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

तत्काळ इंटरनेट सेवा बंद

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने श्रीनगरमध्ये तत्काळ इंटरनेट सेवा (Internet Service) बंद करण्यात आली आहे. यासिनच्या समर्थकांकडून झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शहरही बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि निकालापूर्वी श्रीनगरजवळील मैसुमा परिसरात असलेल्या यासीन मलिकच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. सध्या परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

हेही वाचा – श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्लात पोलिसाचा मृत्यू; गोळीबारात चिमुकलीही गंभीर जखमी

- Advertisement -

पटियाला हाऊस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी 19 मे रोजी मलिकला दोषी ठरवले होते. तसेच, त्याच्या शिक्षेबाबत निकाल राखून ठेवला होता. आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासन आधीच सतर्क होते. मात्र बुधवारी यासीनच्या समर्थकांची थेट सुरक्षा दलांवर अचानक दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला.

सर्व आरोप मान्य

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक यांने त्याच्यावरील आरोपांना विरोध केला नाही. आरोपांमध्ये UAPA ची कलम 16 (दहशतवादी कृत्ये), 17 (दहशतवादी कृत्यांसाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कट रचणे) आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे), भारतीय दंड 120-बी(गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) ही कलमे लावली आहेत.

दरम्यान, मागील सुनावणीत न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.


हेही वाचा – अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी हायटेक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -