घरदेश-विदेश'इंटरनेटमुळे वाढली बलात्काराची संख्या'

‘इंटरनेटमुळे वाढली बलात्काराची संख्या’

Subscribe

राजस्थानच्या उर्जा मंत्री बी.डी.कल्ला यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटनांसाठी इंटरनेट जबाबदार आहे.

भारतात वाढत असलेल्या बलात्कार आणि मुलींवर होण्याऱ्या अत्याचारामागे इंटरनेट आणि मोबाइल जबाबदार आहे असं राजस्थानचे उर्जा मंत्री बी. डी. कल्ला यांचं म्हणनं आहे. सोमवारी जयपूरच्या कॉंग्रेस मुख्यालयात मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, इंटरनेटवर अनेक अश्लील गोष्टी सगळ्यांनाच सहजच उपलब्ध होतात ज्यामुळे एक विकृत मानसिकता निर्माण होतं. राजस्थानमधल्या टॉंक जिल्ह्यात एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून झाल्याची घटना घडली. हैदराबाद येथे झालेल्या बलात्कार घटनेसंदर्भात कल्ला बोलत होते. उर्जासह जल संसाधन, कला आणि संस्कृतीचे देखील ते मंत्री आहे.

‘सध्या घडत असलेल्या भयानक गुन्हांसाठी इंटरनेट आणि मोबाईलचा अती उपयोग हे कारणीभूत आहे. मी केंद्र सरकाराकडे इंटरनेटवर असलेल्या अश्लील गोष्टींवर सेन्सॉरशिप लावण्याची मागणी केली आहे.’
– बी.डी.कल्ला, राजस्थान मंत्री.

मोबाईल फोन हा सगळ्यांकडेच उपलब्ध असतो आणि त्यामुळे इंटरनेटवर असलेल्या अश्लील गोष्टी सहज पाहता येतात. जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा त्या गुन्हेगारावर कारवायी केली जाते पण हा योग्य उपाय नाही. या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन काम केलं पाहिजे. आपली संस्कृती ही धोक्यात आहे. अशा अश्लील गोष्टींवर ताबडतोब सेन्सॉरशिप लावली पाहीजे. असं देखील कल्ला पुढे म्हणाले.

- Advertisement -

कल्ला यांच्या म्हणण्याप्रमाणे राजास्थानची राज्य सरकार या गोष्टीबद्दल पुढच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा करतील. इंटरनेट हे केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे इंटरनेटच्या काही गोष्टींवर सेन्सॉरशिप लावण्याबाबत देखील ते बोलतील. भारतात महिलांवर होणारा बलात्कार, विनयभंग, हत्या या सगळ्या घटना काही नवीन राहिलेल्या नाहीत. तर एकंदरीतच भारतात महिला या सुरक्षीत आहेत का असा प्रश्न आवासून उभा राहतो.


 

हेही वाचाः निर्भया बलात्कार प्रकरण: नराधमांना फाशी देण्यासाठी ‘जल्लाद’ मिळेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -