परदेशात जाणाऱ्यांसाठी बुस्टर डोसमध्ये सवलत, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बुस्टर डोसमध्ये सवलत देण्याची घोषणा केली आहे.  सरकारच्या सल्लागार समितीने दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती.

post-vaccination bleeding or blood clots are less common In India, AEFI reports to Ministry of Health

परदेशात जाणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. दुसरा डोस आणि बुस्टर डोसच्या दरम्यानचा कालावधी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आले आहे. याआधी दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनंतर बुस्टर डोस मिळत होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बुस्टर डोसमध्ये सवलत देण्याची घोषणा केली आहे.  सरकारच्या सल्लागार समितीने दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सरकारने हे अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत म्हणजेच ३ महिने केले आहे. त्यामुळे परदेशी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात  आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम असून रुग्णाच्या संख्या वाढली तर आपण योग्य काळजी घेऊ, असेही टोपे म्हणाले होते. तर शुक्रवारी पुण्यात बोलताना टोपे म्हणाले की, रोज  १००-१२५ रुग्णसंख्या वाढत आहे.  पण ते फारसे भीतीदायक किंवा गंभीर नाही.  कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही.  रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रुग्ण वाढत आहेत हे खरे आहे.   पण अतिशय सौम्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर आहे.