घरदेश-विदेशसूर्य प्रकाशाच्या सानिध्यातील व्यक्तींवर कोरोनाचा कहर कमी, मृत्यूदरात होतेय घट

सूर्य प्रकाशाच्या सानिध्यातील व्यक्तींवर कोरोनाचा कहर कमी, मृत्यूदरात होतेय घट

Subscribe

सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येणाऱ्यांसाठी कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना व्हायरसचा जगभरमध्ये शिरकाव होऊन जवळपास वर्ष झाले आहे. तरीही कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. जगभरमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने रूग्णसंख्या वाढवत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दीच्या ठिकाणे टाळणे तसेच कमीत कमी लोकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन सरकारमार्फतही करण्यात येत आहे. सध्या उकाड्याच्या पाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात वाढ झालेली पहायला मिळत आहे. वाढता उकाडा हाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संक्रमण रोखण्यासाठी एक प्रकारे उपयुक्त ठरण्याची चिन्हे आहेत. वाढत्या उकाड्यामुळे तसेच कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे घरी राहूनच अधिकाधिक लोकांनी काम करावे असे आवाहन सरकार करत आहे. पण सरकारचे हे आवाहन नागरिकांच्या पथ्थ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. एका संशोधनानुसार उकाड्याचा प्रभाव हा कोरोनाचा कहर कमी होण्यासाठी प्रभावी ठरत आहे. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येणाऱ्यांसाठी कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नुकत्याच एका संशोधांनामधे वाढत्या उकाड्याच्या तापमानामुळे कोरोना व्हायरसने होणाऱ्या मृत्यू दरात घट झाली असल्याचे समोर आले आहे. एडीनबर्ग विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार, जे लोक जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात असतात, त्यांच्यावर सूर्यप्रकाशामधून येणार्‍या यू-वी रेज (किरणांचा ) प्रभाव ताबडतोब त्यांच्या शरीरार पडतो. यामुळे मानवाच्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास, आजार, रोग बरे होण्यास मदत होते. तसेच जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्युदर कमी करण्यास हा सुर्यप्रकाश मदतीचा ठरतो आहे, असेही निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

यू- वी रेज किरण हे ९५ टक्के शरीराच्या खोलवर जाऊन शरीराला आवश्यक असणार्‍या घटकांवर परिणाम करतात. ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात जानेवारी ते एप्रिल २०२० या कालावधीत अमेरिकेतील कोरोना व्हायरस पासून मृत्यूमुखी झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. सर्व मृतांची तुलना करण्यात आली. आणि मृत्यू झालेल्या रुग्णांमधे यू वी किरणाचा किती प्रमाण आहे हे तपासण्यात आले त्यामध्ये अल्ट्रा व्हायलेटचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. तसेच इंग्लंड आणि इटली मध्येही अशाच प्रकारचे संशोधन करण्यात आले.तिथेही अमेरिकेतील रुग्णांप्रमाणे यू वी किरणाचा अत्यंत कमी प्रभाव असल्याचे अहवालात आढळून आले. दररोज सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात `ड’ जीवनसत्वाची निर्मिती होते. तसेच मानवाच्या शारीरिक, मानसिक क्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचे सर्वाधिक महत्व आहे.


हे हि वाचा – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात निवड करा ‘आठ’ खाद्यपदार्थांची

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -