घरदेश-विदेशपाच हजार गुंतवा आणि लाखो कमवा, सरकारही देतंय मदत

पाच हजार गुंतवा आणि लाखो कमवा, सरकारही देतंय मदत

Subscribe

कोरोनाच्या काळात नोकरी गेलेल्यांना व्यवसाय करण्याचा सुवर्णसंधी आहे. भारतात चहाप्रेमी खूप आहेत. त्यातच कुल्हड चहा फारच प्रसिद्ध आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची जोरात मागणी आहे. अशातच आपण कुल्हड चहा तयार करणे आणि विकण्याचा व्यवसाय करू शकता. या व्यवसायात पाच हजार गुंतवा आणि लाखो कमवायची संधी आहे.

केंद्र सरकार सध्या प्लास्टिक कपला हद्दपार करण्यासाठी कुल्हड चहाची मागणी वाढविण्याकडे लक्ष देत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींनीही कुल्हडमधून चहा देण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक आणि कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, मोदी सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली असून या योजनेंतर्गत केंद्र सरकार कुंभारांना विजेवर चालणारे चाक देते. त्यावरून ते मातीची भांडी तयार करू शकतात. त्यानंतर सरकार कुंभारांकडून ते कुल्हड चांगल्या किमतीत खरेदी करतात.

- Advertisement -

व्यवसाय सुरु करण्यासाठी ५ हजार रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, यंदा सरकार २५ हजार इलेक्ट्रिक चाक वितरीत करणार आहे. चहाच्या कुल्हडची किंमत सुमारे ५० रुपये आहे. त्याचप्रमाणे लस्सी कुल्हडची किंमत दीडशे रुपये आहे तर दुधाच्या कुल्हडची किंमत १०० रुपये ते दीडशे रुपये आहे. मागणी वाढल्यास चांगली किंमत मिळण्याचीही शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -