घरदेश-विदेशआखाती देशांमध्येही पीएफआयची पाळेमुळे! हवालाद्वारे पाठवले जायचे भारतात पैसे

आखाती देशांमध्येही पीएफआयची पाळेमुळे! हवालाद्वारे पाठवले जायचे भारतात पैसे

Subscribe

देशविरोधी कारवायांच्या आरोपीखाली तपास यंत्रणा NIA आणि ED ने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित कार्यकर्ते आणि संपत्तीवर छापेमारी केली. दरम्यान पीएफआय संघटनेबाबत आता एक मोठी माहिती समोर येत आहे. पीएफआयची केवळ भारतातचं नाही तर आखाती देश, आणि यूएईमध्ये पाळेमुळे रुजल्याचे समोर आलं आहे. या देशांमधील पीएफआयच्या सदस्यांकडून हवालाद्वारे मोठ्या प्रमाणात भारतात पैसे पाठवले जात होते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अनिवासी भारतीयांच्या अकाऊंटचा वापर पीएफआय सदस्य आखाती देशांमधून निधी पाठवण्यासाठी करत होते. निधी मिळाल्यानंतर हे सदस्य दुसऱ्या अकाऊंटमध्ये तो वर्ग करायचे. नंतर ही रक्कम फिरून पीएफआयपर्यंत पोहोचायची.

अहवालानुसार, पीएफआयचे समर्थक आणि सदस्य यूएई, कतार, तुर्की आणि ओमानमध्ये काम करत होते. या देशांकडून ते पीएफआयला आर्थिक मदत करत होते. हा पैसा पीएफआयने एजन्सींच्या नजरेपासून लपवून ठेवला होता. एवढेच नाही तर तपास यंत्रणांना मूर्ख बनवण्यासाठी पीएफआयने अनेक बनावट संघटना तयार केल्या. त्यापैकी तीन संघटना परदेशात स्थापन झाल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांत अनेक पीएफआय कार्यकर्त्यांनी युएईला प्रवास केला. संस्थेसाठी निधी उभारणे हा त्यामागचा हेतू होता. पीएफआयच्या सदस्यांनी हवालाद्वारे कथितरित्या भारतात मोठ्या निधी पाठवला होता. पीएफआय कार्यकर्त्यांनी सुमारे 44 लाख रुपये ओमनमधून हवाला मार्गाने भारतात पाठवल्याची माहिती आहे.

एजन्सींचा आरोप आहे की, पीएफआयने आखाती देशांमध्ये आपले सदस्य आणि व्यापाऱ्यांना कट्टरतावादी बनवून निधी उभारला. भारतातील मुस्लिम किती असुरक्षित आहेत हे दाखवण्यासाठी पीएफआय व्यापार्‍यांना भुरळ घालण्यासाठी खास व्हिडिओ दाखवत असे. अबुधाबीमधील पीएफआयचा कथित सदस्य असलेला सैफू रिअल इस्टेटचा व्यवसाय हाताळतो. सौदी अरेबियातील लोक त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने PFI सदस्यांमध्ये सामील होतात, यात त्यांचा खरे उद्दिष्ट त्यांना कट्टरपंथी बनवणे हा आहे.


उदे गं अंबे उदे! नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -