घरदेश-विदेशराबडी देवींची सीबीआय पथकाकडून चौकशी; चौकशीचे कारण अस्पष्ट

राबडी देवींची सीबीआय पथकाकडून चौकशी; चौकशीचे कारण अस्पष्ट

Subscribe

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी आज सकाळी सीबीआय पथक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय पथकाकडून राबडी देवी यांची फक्त चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहार राज्याच्या माजी महिला मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक बिहारमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (ता. ०६ मार्च) सकाळी सीबीआयची टीम राबडी देवी यांच्या घरी पोहोचली. परंतु, सीबीआयकडून राबडी देवी यांची कोणत्या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. सीबीआयच्या १२ सदस्यांचे पथक राबडी देवी यांच्या घरी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच सीबीआयचे १२ सदस्य असलेले पथक राबडी देवी यांच्या घरी दाखल झाले. राबडी देवी यांचा मुलगा अर्थात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यावेळी तिथे हजर होते. पण सध्या बिहारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने तेजस्वी यादव हे तिथे फारवेळ न थांबता विधानसभेत दाखल झाले. परंतु, जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणी राबडी देवी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे सीबीआयकडून राबडी देवडी यांच्या घरी छापा टाकण्यात आलेला नाही.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
जमिनीच्या बदल्यात नोकरी म्हणजेच लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणात राबडी देवी, लालू प्रसाद यादव आणि मिसा यांना याआधीच समन्स जारी करण्यात आलेला आहे. राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून हा समन्स देण्यात आलेला होता. सीबीआयकडून या प्रकरणात चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने राबडी देवी यांना १५ मार्च यादिवशी कोर्टात हजर राहण्यास सांगितलेलं आहे. पण त्याआधीच सीबीआयचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, नेमके याचं प्रकरणात राबडी देवींची चौकशी करण्यात येत आहे की कोणते वेगळे कारण आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हेही वाचा – आप मधील गटबाजी थेट मारहानीपर्यंत; सोशल मीडियाप्रमुख शिलेंद्र सिंग यांना मारहाण

- Advertisement -

दरम्यान, बिहारमध्ये सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राबडी देवडी यांचा मुलगा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव यांना विधानसभेत हजर राहावे लागणार आहे. त्याचमुळे तेजस्वी यादव हे सीबीआयचे पथक घरी येऊन सुद्धा अधिवेशनात हजर राहिलेले आहेत. परंतु, पहाटेच आलेल्या सीबीआय पथकामुळे बिहारच्या राजकरणात चर्चांना उधाण आले आहे.

राबडी देवींच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
राबडी देवी यांच्या घरी सीबीआयचे पथक चौकशी करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राबडी देवींच्या समर्थानात त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. ही चौकशी आधी राबडी देवी यांच्या कार्यालयात होणार होती. याबाबतची नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आली होती. परंतु नंतर चौकशी घरी करण्याचे सीबीआयकडून ठरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -