Petrol Diesel Price: इंधनाच्या किमती आजही स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबईसह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. गेल्या १६ दिवसांत १४वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे.

Maharashtra government issues notification to cut VAT on CNG; fuel to be cheaper from Apr 1

मुंबईसह देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. गेल्या १६ दिवसांत १४वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे. मात्र दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळं सर्वसामन्यांना आजही दरवाढीतून दिलासा मिळाला आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात २२ मार्चनंतर आजपर्यंत १४ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत १० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी ४ नोव्हेंबर, २०२१ नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.

गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस देशांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत १२०.५१ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत १०४.७७ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर १.५० रुपयांनी वाढून १२३.५३ रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.

देशातील महानगरांत दर काय?

शहरं          पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)        डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई                  120.51                                   104.77
दिल्ली                105.41                                   96.67
चेन्नई                  110.85                                   100.94
कोलकाता            115.12                                    99.83

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर ९-१२ रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत ८५ टक्के आयातीवर अवलंबून आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.

असे पाहा आपल्या शहरातील पेट्रोलचे दर

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – एसटी संपाचा तिढा सुटला!