घरताज्या घडामोडीसमुद्राच्या पाणीपातळीत वाढ होतानाच सतत पूर येण्याची शक्यता, IPCC अहवाल

समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होतानाच सतत पूर येण्याची शक्यता, IPCC अहवाल

Subscribe

२० वर्षात इतकी उष्णता वाढेल की माणसाचे जगणे होईल कठीण, IPCCचा इशारा

जगातील हवामान बदलाविषयी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यात जागतिक तापमानवाढीमुळे येत्या काळात कोण कोणते दुष्परिणाम होतील, याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंज २०२१च्या अहवालात सांगण्यात आले आहे. येणाऱ्या काळात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि यामुळे समुद्राच्या पातळीतील वाढ होणे, कमी वेळता जास्त पाऊस पडणे, सतत पूर येणे, दुष्काळी परिस्थितीत वाढ होणे, अशा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

IPCCच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे पुढील २० वर्षात पृथ्वीवरील तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढले. एवढेच नाही तर या अहवालात असे देखील म्हटले आहे की, ५० वर्षातून जी प्रचंड गरमी येते आता ती दरवर्षी येत आहे. पृथ्वीवरील तापमान उष्ण होण्याची सुरुवात आहे. या अहवालात १९५ देशातील हवामान आणि प्रचंड गरमीसंबंधित आकड्यांचे विश्लेषण केले गेले आहे.

- Advertisement -

IPCCच्या अहवालातील संशोधक म्हणाले की, ‘गेल्या ४० वर्षांपासून गरमी जितक्या वेगाने वाढत आहेत, इतकी गरमी १८५० नंतर चार दशकात वाढली नाही. जर आपण प्रदूषण रोखले नाही तर प्रचंड गरमी, तापमान वाढ आणि अनियंत्रण पावसाचा सामना करावा लागेल.’ या अहवालाचे प्रमुख लेखक आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक फ्रेडरिको ओट्टो म्हणाले की, ‘हवामान बदल ही भविष्याची समस्या नसून वर्तमानाची समस्या आहे. जगभरातील कोनाकोपऱ्यावर याचा परिणाम होत आहे. जर पर्यावरण असेच राहिले तर भविष्यात अजून भयावह स्थित होईल. जर प्रदुषण अशाच प्रकारे वाढत राहिले, हवामानातील बदल थांबले नाही तर २१००पर्यंत तापमान ४.४ डिग्री सेल्सिअसने वाढेल. तसेच आर्क्टिक, ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाचे हिमनदी आणि बर्फाळ खडक खूप वेगाने वितळतील. जर तापमानवाढ कमी झाली नाही तर २०१५च्या पॅरिस करार अंतर्गत ५ मोठ्या समस्या उभ्या राहतील. पुढील २० वर्षात तापमानवाढ १.५४ डिग्री सेल्सियस होईल. यामुळे पॅरिस कराराची उद्दिष्टे पूर्ण होणार नाहीत. म्हणजेच, संपूर्ण जग तापमान रोखण्यात अपयशी ठरेल.’

फ्रेडरिको ओट्टो पुढे म्हणाले की, ‘तापमानात सतत वाढ झाल्यामुळे कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीमध्ये जंगलाला आग लागण्याच्या घटना कमी होणार नाहीत. अशी आग हाताळणे कठीण होईल. जर बर्फ संपला आणि जंगल भस्मसात झाले तर पाणी आणि हवा या दोन्हीसंदर्भातील समस्या निर्माण होतील. या परिस्थितीत किती दिवस जगण्याची अपेक्षा करू शकता? जर ध्रुवांवरील बर्फ वितळला तर समुद्राची पातळी वाढेल. जे देश समुद्र सपाटीपासून फक्त काही इंचावर आहेत, ते देश सहज बुडतील. जंगलातील आगीतून निघणाऱ्या धुरामुळे अनेक देशातील आणि आजूबाजूच्या देशातील लोकांना श्वास घेणे कठीण होईल.’ त्यामुळे जर तापमानवाढ कमी झाली नाही तर अशा समस्यांना पुढील काळात सामोर जावे लागणार आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -