खरंच सॅनिटरी पॅड्समुळे कॅन्सर होतो का ? काय म्हणताहेत तज्त्र

सॅनिटरी पॅड्समध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण करणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याचे समोर आले. परिणामी कॅन्सरग्रस्त महिलांच्या आकड्यातही वाढ होत आहे.

पिरियड्समध्ये वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्समुळे महिलांना कॅन्सर होत असल्याचा दावा स्विडनच्या इंटरनॅशनल पॉल्युटेंट्स इलिमिनेशन नेटवर्क (IPEN) या स्वसंसेवी संस्थेने केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या संस्थेने टॉक्सिक लिंक या स्थानिक संस्थेबरोबर संयुक्तपणे सॅनिटरी पॅड्सची चाचणी केली.

यावेळी सॅनिटरी पॅड्समध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण करणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याचे समोर आले. परिणामी कॅन्सरग्रस्त महिलांच्या आकड्यातही वाढ होत आहे. याकडे या संस्थेने संपूर्ण जगाचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

या संस्थेच्या माहितीनुसार भारतातील सॅनिटरी पॅड््सची निर्मिती करणाऱ्या १० नामांकित ब्रॅण्ड्सच्या सॅनिटरी पॅड्सचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी सॅनिटरी पॅड््समध्ये थॅलेट आणि कार्बनिक पदार्थ असल्याचे आढळले. सॅनिटरी पॅड्सचा थेट संबंध महिलांच्या शरिराशी येत असल्याने हे हानिकारक रसायने पॅड्सच्या माध्यमातून योनीद्वारे शरीरात शोषजाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

यामुळे पॅड्सच्या माध्यमातून या कार्सिनोजेन्ससह इतर रसायनांचा धोका महिलांना सर्वाधिक असल्याचा दावा डॉ. आकांक्षा मेहरोत्रा, टॉक्सिक्स लिंकच्या कार्यक्रम समन्वयक यांनी केला आहे. तसेच युरोपिय देशांच्या तुलनेत भारतात सॅनिटरी पॅड्ससाठी आवश्यक नियम नाहीत . यामुळे यात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.