घरदेश-विदेशवेळेत पगार नसल्याने iPhone निर्मात्या कंपनीची कर्मचाऱ्यांकडून तोडफोड; १२५ जणांना अटक

वेळेत पगार नसल्याने iPhone निर्मात्या कंपनीची कर्मचाऱ्यांकडून तोडफोड; १२५ जणांना अटक

Subscribe

कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

बंगळुरुत आयफोनची निर्मिती करणाऱ्या Wistron कंपनीत तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील नरसापूर इंडस्ट्रियल भागात असलेल्या तायवान कंपनीच्या कारखान्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. wistron ही कंपनी भारतात जगप्रसिद्ध अॅपल कंपनीच्या आयफोनचं उत्पादन करते. याठिकाणी कर्मचाऱ्यांनी हिंसाचार करत काचा, वाहनांची तोडफोड केली आहे. कोलार जिल्ह्यात असणाऱ्या या प्लांटमधील कर्मचारी वेळेत पगार मिळत नसल्याने तसंच अतिरिक्त काम केल्याचा भत्ताही दिला जात नसल्याने नाराज होते. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी तोडफोड करत हिंसाचार केला. पोलिसांनी याप्रकरणी १२५ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला राग कंपनीत तोडफोड करुन काढला आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीमध्ये कंपनीचे तब्बल ४३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कर्मचारी हिंसाचार करत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यामध्ये कर्मचारी काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बॅटरीला आग लावण्यात आली.

- Advertisement -

कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्र आहे. येथे तायवान कंपनी अॅपल आयफोनची निर्मिती करते. या कंपनीच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. बराच वेळ कर्मचाऱ्यांच्या वतीने हंगामा सुरु होता. कर्मचाऱ्यांनी कारखान्यात उभ्या असलेल्या काही वाहनांनाही आग लावली. तसेच दगडफेकही केल्याचे सांगितले जात आहे. तर गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पूर्ण पगार दिला जात नसून अतिरिक्त काम करण्याची सक्ती केली जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -