IPL 2021- सप्टेंबर महिन्यात पुन्हा रंगणार IPL चा थरार

भारतीय क्रिकेट आणि क्रिकेट रसिकांसाठी सप्टेंबर महीना खुपच व्यस्त राहणार आहे.

ipl

गेल्या दीड महिन्यांपासून पाच कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यातील शेवटचे दोन कसोटी सामने संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच इंडियन प्रीमियर लीग (IPL)२०२१ च्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ पाच कसोटी मालिका खेळत आहे यात तीन कसोटी सामने झाले असून भारत-१, इंग्लंड-१ आणि एक सामना अनिर्नित ठरला आहे. यापुढचे दोन सामने २ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत खेळले जाणार आहेत. मालिकेचा चौथा सामना २-६ सप्टेंबर आणि पाचवा सामना १०-१४ सप्टेंबर या कालावधीत होईल.

भारतीय संघाचा हा दौरा १४ सप्टेंबरला संपल्यानंतर खेळाडू (UAE)दुबईसाठी रवाना होणार आहेत.इंडियन प्रीमियर लीग (IPL)-२०२१ च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे.यानंतर सर्व खेळाडू IPLमध्ये आप-आपल्या फ्रॅंचायसीसाठी खेळताना दिसतील.

सप्टेंबर महिन्यात २२ दिवस मैदानावर दिसणार भारतीय खेळाडू.

जाणून घेऊया कसा असेल क्रिकेट सामन्यांचा थरार

२-६ – भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना
१०-१४ – भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना
१९ सप्टेंबर – चैन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस
२० सप्टेंबर – कोलकत्ता नाईटराईडर्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
२१ सप्टेंबर -पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२२ सप्टेंबर – दिल्ली कैपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
२३ सप्टेंबर – मुंबई इंडियंस विरुद्ध कोलकाता नाइटराइडर्स
२४ सप्टेंबर – रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२५ सप्टेंबर – दिल्ली कैपिटल्स विरुद्ध राजस्थान रायल्स आणि सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स
२६ सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध मुंबई इंडियंस
२७ सप्टेंबर – सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२८ सप्टेंबर -कोलकाता नाइटराइडर्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स आणि मुंबई इंडियंस विरुद्ध पंजाब किंग्स
२९ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
३० सप्टेंबर – सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


हे ही वाचा – IPL 2022 मध्ये दोन नवीन संघ, BCCI ने काढलं टेंडर, कोण होणार मालक?