Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IPL Final : गुजरात की चेन्नई? कोण ठरणार विजयाचा मानकरी

IPL Final : गुजरात की चेन्नई? कोण ठरणार विजयाचा मानकरी

Subscribe

IPL 2023 च्या सामन्यांमधील आजचा अंतिम सामना गुजरात आणि चेन्नई संघामध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियम म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना खेळला जाणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चित्तथरारक पद्धतीने सुरु असलेल्या IPL 2023 च्या सामन्यांमधील आजचा अंतिम सामना गुजरात आणि चेन्नई संघामध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियम म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना खेळला जाणार आहे. गुजरात ही सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आल्याने पुन्हा एकदा विजेतेपदावरती हा संघ आपले नाव कोरणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तर महेंद्रसिंग धोनीचा संघ आयपीएलमध्ये आपली सत्ता गाजवणार? याबाबत देखील सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे आजचा सामना हा अहमदाबाद म्हणजेच गुजरातच्या होम ग्राउंडवर असल्याने आजच्या सामन्यात गुजरातचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. (IPL Final Who will win Gujarat or Chennai?)

हेही वाचा – New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट

- Advertisement -

नरेंद्र मोदी स्टेडीयममधील मैदानावरती आजपर्यंत गुजरातने एकूण नऊ सामने खेळलेले आहेत. यामधील सहा सामन्यांमध्ये गुजरातचा संघ विजयी झाला आहे, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. तर दुसरीकडे मात्र चेन्नई संघाने या मैदानावर आत्तापर्यंत तीन सामने खेळलेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नईला पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे चेन्नई संघाला या सामन्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

गुजरात संघ यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत पहिल्या स्थानावर कायम राहिला. पहिल्या उपांत्य फेरीत चेन्नईने गुजरातचा पराभव केल्याने चेन्नई या आयपीएलमध्ये फायनल गाठणारा पहिला संघ ठरला. तर त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत गुजरातने मुंबई संघाला घरचा रस्ता दाखवत फायनलमध्ये उडी मारली. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधील गुजरातची कामगिरी पाहत धोनीच्या संघासमोर निश्चितच मोठे आव्हान आहे.

- Advertisement -

गेल्या आयपीएलच्या पर्वात लखनऊ आणि गुजरात हे दोन्ही नवे संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. पण गुजरातने विजेतेपद पटकावून सर्वांनाच चकित केले होते. यावेळीही संघाने जवळपास समान खेळाडूंसह आयपीएलचे सामने खेळत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरातने या पर्वात आतापर्यंत एकूण 16 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 11 सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत.

डेव्हिड मिलर, राशिद खान, नूर अहमद आणि जोशुआ लिटल या चारही दुसऱ्या देशातील खेळाडूंनी गुजरात संघात खेळत आपली उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तर मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या या तिन्ही भारतीय खेळाडू देखील या वर्षी उत्कृष्ट खेळी केलेली आहे.

विशेष म्हणजे आजच्या सामन्यात चेन्नई संघासमोर शुभमन गिलचे तगडे आव्हान असणार आहे. आतापर्यंत गीलने तीन शतके आणि 851 धावा केल्या आहेत. मोहम्मद शमी (28 विकेट), राशिद खान (27 विकेट) आणि मोहित शर्मा (24 विकेट) यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आपली कामगिरी चोख बजावली आहे. त्याचबरोबर गिल व्यतिरिक्त पंड्याने फलंदाजीत 325 धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने आयपीएलमध्ये मुंबईनंतर सर्वाधिक चार विजेतेपदे (पाच विजेतेपदे) जिंकलेली आहेत. या संघाने 14 पैकी 12 पर्वांमध्ये प्लेऑफपर्यंत मजल गाठली आहे. आता 10व्यांदा हा संघ धोनीच्या नेतृत्वात अंतिम सामना खेळत आहे.

चेन्नईने या पर्वात आतापर्यंत खेळलेल्या 15 पैकी नऊ सामने जिंकले आहेत आणि पाच सामने पराभूत झाले आहेत. या संघाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, महिश तेक्षाना आणि मथिश पाथिराना या चार परदेशी खेळाडूंनी या पर्वात उत्तम कामगिरी केली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून कॉनवेने 625 धावा, ऋतुराज गायकवाड 564 धावा आणि अजिंक्य रहाणेने 299 धावा केल्या आहेत. तर शिवम दुबेने 386 धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये दुबेने 33 षटकार मारले आहेत. गोलंदाजीत पाथीरानाने 17 तर देशपांडेने 21 विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -