IPL 2022 Final : अंतिम सामन्याला पंतप्रधान मोदींसह, अमित शाह लावणार हजेरी; 6 हजार पोलीस तैनात

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा अंतिम सामना (Final Match) रविवार 29 मे रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा अंतिम सामना (Final Match) रविवार 29 मे रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तसेच या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या स्टेडियमसह आसपासच्या ठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस (Police) तैनात करण्यात आल्याची माहिची माहिती समोर येत आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या पर्वाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रवेश केला आहे. प्ले ऑफमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात पहिला क्वॉलीफायर सामना झाला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर आज, शुक्रवारी क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरु संघात होणार असून विजेता संघ गुजराविरुद्ध फायलन खेळेल.

हेही वाचा – IPL 2022 : दिल्लीच्या पराभवानंतर मुलींनी घेतली वॉर्नरची शाळा, डेव्हिड वॉर्नरचा खुलासा

यंदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव घटल्याने सरकारने सर्व निर्बंध शिथील केल्यामुळे यंदाची आयपीएल प्रेक्षकांना स्टेडीयममध्ये बसून पाहता आली. शिवाय, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा – IPL 2022 : एका विधानामुळे रिद्धिमान साहाने मध्येच सोडला संघ, whatsapp ग्रुपमधून पडला बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचा समारोप कार्यक्रम 29 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरु होणार असून, पुढील 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर 7:30 वाजता अंतिम सामन्याकरीता नाणेफेक होणार आहे. तर 8:00 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – श्रीलंकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतल्या 10 विकेट, बांगलादेशचा पराभव करत WTC मध्ये मिळवले दुसरे स्थान