घरदेश-विदेशआता पोस्टातूनही मिळणार कर्ज

आता पोस्टातूनही मिळणार कर्ज

Subscribe

तुम्ही आता कर्ज काढण्यास इच्छुक असाल, तर भारतातील इंडिया पोस्ट पेमेंट बँक आता ही सुविधा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टला इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) चं उद्घाटन करणार आहेत.

बँकेतून कर्ज मिळवायचं म्हणजे नाकी नऊ येतात. मात्र आता कर्ज काढणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. तुम्ही आता कर्ज काढण्यास इच्छुक असाल, तर भारतातील इंडिया पोस्ट पेमेंट बँक आता ही सुविधा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टला इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) चं उद्घाटन करणार आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे की, राष्ट्रीय पातळीवर आयपीपीबीची सुरुवात झाल्यानंतर विश्वासू पोस्ट बँकिंग सेवेमुळं लाखो भारतीयांसाठी पोस्ट बँकरदेखील बनेल. ही बँक कर्ज देण्यासह म्युच्युअल फंड आणि विमा पॉलिसीदेखील देऊ शकणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात याची एक शाखा असेल. दरम्यान ग्रामीण भागात वित्तीय सेवेसाठी ही योजना राबवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. सध्या या बँकेच्या दोन शाखा निर्माण झाल्या असून प्रत्येक जिल्ह्यातील एकूण ६४८ शाखा लवकरच सुरु होतील.

दुप्पट होणार बँकेची ऑपरेशनल शाखा

पोस्टाच्या विभागाचा प्रचार संपूर्ण देशातील अगदी कानाकोपऱ्यात आहे. त्यामुळं यामध्ये आता वित्तीय सेवा मिळवण्यासाठी या लोकांना सहभागी होता येऊ शकेल. पोस्टामध्ये बँक आल्यामुळं ग्रामीण भागामध्ये बँकेच्या शाखा ४९ हजारावरून साधारण दीड लाख म्हणजे दुप्पट होतील. पोस्ट ऑफिसमध्ये डिजीटल बँकिंग सुरु होण्यामुळं खातेदारांना आपल्या खात्यातून कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करता येतील. पोस्ट ऑफिसमध्ये ३४ कोटी बचत खातेधारक आहेत. यामध्ये १७ कोकटी पोस्ट ऑफिसमध्ये बचत बँक खाती आहेत. बाकी इन्कम स्कीम आणि आरडी खात्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मोबाईल अॅपचाही पर्याय होणार उपलब्ध

खातेधारकांना आपल्या आयपीपीबी खात्यातून सुकन्या समृद्धी, आरडी, एफडी अशा स्वरुपाच्या पेमेंटमध्ये पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आयपीपीबी लवकरच मर्चंट नोंदणीला सुरुवात करेल. आयपीपीबी लवकरच आपलं अॅपवर आधारित पेमेंट सिस्टिम घेऊन येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -