घरदेश-विदेशआयपीएस अरुण बोथरा यांना हरियाणातील 'या' गावी जाऊन राहायचंय, कारण...

आयपीएस अरुण बोथरा यांना हरियाणातील ‘या’ गावी जाऊन राहायचंय, कारण…

Subscribe

नवी दिल्ली : ओदिशा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण बोथरा यांना हरियाणातील गावात वास्तव्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला कारण हरियाणातील एका गावात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीचे. या निवडणुकीतील एका उमेदवाराने दिलेली आश्वासने सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचाच संदर्भ घेत अरुण बोथरा यांनी तिथे वास्तव्य करत असल्याचे म्हटले आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर निवडणुकीचे पोस्टर व्हायरल होत असून ते एका उमेदवाराचा जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरला आहे. हरियाणातील सिरसाढ गावात सरपंचपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी हा एक उमेदवार आहे. निवडणूक येताच, जनतेला आकर्षित करण्यासाठी नेते विविध प्रकारची आमिषे आणि आश्वासने देतात. नंतर ती आश्वासने हवेत विरतात. या व्हायरल पोस्टमधील आश्वासने देखील तशीच आहेत. सोशल मीडियावर हा जाहीरनामा पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

- Advertisement -

आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्टरचे छायाचित्र शेअर केले आहे. या उमेदवाराचे नाव जयकरण लथवाल असून त्याने आश्वासनांची लांबलचक यादी दिली आहे. तीन विमानतळे, मोफत वायफाय, महिलांसाठी मोफत मेकअप किट आदींसह एकूण 13 आश्वासने दिली आहेत.

ही आहेत आश्वासने –
गावाच्या चौकात दररोज सरपंचाचा ‘मन की बात’ कार्यक्रम, गावात तीन विमानतळे बांधणार, महिलांसाठी मोफत मेकअप किट देणार, पेट्रोल 20 रुपये, गॅस 100 रुपये प्रति सिलिंडर, सिरसाढ ते दिल्ली मेट्रोसेवा, जीएसटी हटवणार, प्रत्येक कुटुंबासाठी एक मोफत दुचाकी, मोफत वाय-फाय सुविधा, तळीरामांना रोज एक बाटली दारू, सिरसाढमधील युवकांना सरकारी नोकरी, सिरसाढहून गोहाना शहरात जाण्यासाठी दर पाच मिनिटांनी हेलिकॉप्टर सुविधा.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -