Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'खाकी: द बिहार चॅप्टर'मुळे IPS अधिकारी अमित लोढा निलंबित; अनेक गुन्हे दाखल

‘खाकी: द बिहार चॅप्टर’मुळे IPS अधिकारी अमित लोढा निलंबित; अनेक गुन्हे दाखल

Subscribe

सध्या सगळीकडे ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. ही वेब सीरिज ‘बिहार डायरी’ या पुस्तकावर आधारीत असून बिहारमधील आईपीएस अधिकाऱ्याने त्याचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. दरम्यान, आता बिहारच्या विशेष दक्षता विभागाने आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचं कारण म्हणजे अमित लोढा यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज तयार करण्यात आली आहे. शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर या कंपन्यांसोबत करार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना निलंबीत देखील करण्यात आले आहे.

आयपीएस अधिकारी अमित लोढा निलंबीत
विशेष दक्षता विभाग आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत आयपीएस अधिकारी अमित लोढा यांना 4 ते 10 वर्षापर्यंत शिक्षा दिली जाईल. 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत या प्रकरणाची अंतिम पडताळणीचा करुन सगळे अहवाल दिल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत आयपीएस अधिकारी अमित लोढा यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयाने अजून या निलंबणाबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु आईपीएस अधिकाऱ्यांनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांमध्ये निलंबन निश्चित असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

नोव्हेंबर 2018 मध्ये झाला करार
बिहारच्या विशेष दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महानिरीक्षक अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचार, वैयक्तित स्वार्थ आणि आर्थिक लाभ या आरोपांची चौकशी करण्याचे निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.

तसेच नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलरसोबतच्या व्यवसायिक संबंधांची चौकशी देखील करण्यात येणार असल्याचे विशेष दक्षता पथकाने म्हटले. अमित लोढा हे अजूनही शासकीय सेवेत कार्यरत असून ते व्यावसायिक लेखक नाहीत. एखाद्या निर्मिती संस्थेशी, कंपनीसोबत वेब सीरिजसाठी करार करू शकत नाही.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? ‘अथांग’ वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -